जीर्ण पुलामुळे मुंबई-गोवा महामार्ग बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 11:24 PM2019-08-03T23:24:15+5:302019-08-03T23:24:30+5:30
माणगाव तहसीलदारांकडून पोलिसांना सूचना
माणगाव : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावरील गोद नदीवर असलेला मौजे कळमजे पुल हा वाहतुकीस असुरक्षित असल्याबाबत उपविभागीय अभियंता रा. म. महाड यांनी लेखी पत्राद्वारे कळविल्याने कळमजे पूल हा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. शुक्रवारी या पुलाबाबतचे वृत्त लोकमतमध्ये छापून करण्यात आले होते. शनिवारी तो वाहतुकीत योग्य नसल्याने व या गोद नदीला आलेल्या पूरा मुळे हा बंद करण्यात आला आहे.
यापूर्वी २६ ते २७ जुलै २०१९ रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने नदी पूल बंद करण्यात आला होता. पुलाच्या बाजूने गोवा महामार्ग तसेच कोकण रेल्वेचे रुंदीकरणाचे काम चालू असून मातीचे भराव हे मोठ्या प्रमाणात केले असून गोदनदीचे येणारे पाणी पुलामुळे अडले जात असून पुलाच्या स्प्रिंगीग लेवलवर पाण्याची पातळी गेल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पुलावरील वाहतुक थांबविण्यात यावी, असे पत्र उपविभागीय अभियंता राष्ट्रीय यांनी दिले होते. शनिवारी राष्ट्रीय महामार्ग उप अभियंता यांनी पुन: तहसीलदार माणगाव यांना पत्र दिले. यावर तहसीलदार माणगाव यांनी पाहणी करून हा महामार्ग वाहतुकीस बंद ठेवण्याचे आदेश माणगाव पोलिसाना दिला.
पोलीस बंदोबस्त वाढवला
महामागार्ची वाहतुक सुरळीत करण्याकरीता दोन्ही बाजूची वाहतूक थांबुन गोवा बाजूकडून येणारी वाहतूक ही निजामपूर नाका येथून निजामपूर - विळा - सुतार वाडी मार्गे कोलाड अशी वळविण्यात आली आहे तसेच मुंबई बाजू कडून येणारी वाहतूक ही कोलाड मार्गे वळविण्यात आली असुन माणगाव पोलीसानी सदर ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला आहे.