मुंबई-गोवा महामार्गाचा पर्यायी विन्हेरे रस्ता दुभंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:58 PM2019-09-06T12:58:27+5:302019-09-06T12:58:50+5:30
यावर्षीच्या पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात कशेडी घाट पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत काही ठिकाणी खचला आहे.
खेड: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून ओळखला जाणारा असलेला नातूनगर- विन्हेरे- महाड रस्त्याला ऐन गणेशोत्सव कालावधीत मोठे भगदाड पडल्याने बंद झाला आहे. या पर्यायी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात कशेडी घाट पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत काही ठिकाणी खचला आहे. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात काही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास महामार्गावरील वाहतूक नातूनगर - तुळशी - विन्हेरे मार्गाने वळविण्यात येते. मात्र नातूनगर विन्हेरे मार्गे मुंबईकडे जाणारा रस्ता महाड तालुक्यातील फाळकेवाडी या भागात गुरुवारी सायंकाळी खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.