मुंबई-गोवा महामार्ग रुतला चिखलात; वाहनचालक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 12:45 AM2020-09-29T00:45:41+5:302020-09-29T00:46:41+5:30

ठिकठिकाणी खड्डे : चौपदरीकरणाचे काम संथ गतीने; महामार्गाच्या दुतर्फा केलेला मातीचा भरावामुळे दुरवस्था

Mumbai-Goa Highway in Rutla Chikhalat; Driving distressed | मुंबई-गोवा महामार्ग रुतला चिखलात; वाहनचालक त्रस्त

मुंबई-गोवा महामार्ग रुतला चिखलात; वाहनचालक त्रस्त

Next

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने होत असल्याने आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संचारबंदी लागू केल्याने, महामार्गाचे काम ठप्प झाले. यामुळे ऐन पावसाळ्यात नवीन रस्त्याकरिता टाकलेला भराव आणि खड्ड्यांनी संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे. यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत.

दोन राज्यांना जोडणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाेचे चौपदरीकरण २०१४ पूर्वीपासून सुरू आहे. इंदापूर ते पळस्पेदरम्यान पहिल्या टप्प्यात नवीन आणि जुन्या महामार्गाचे वाटोळे झाल्यानंतर लगेचच इंदापूर ते कशेडी या दुसºया टप्प्याला प्रारंभ झाला. यामध्येही गती येत नसल्याचे दिसून येत आहे. २०२० पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासनही देण्यात आले. मात्र, शासकीय परवाने, शेतकऱ्यांचे प्रश्न, मातीची उपलब्धता आदी अडचणींमुळे हे काम रखडले आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून महामार्गाचे कामही बंद करण्यात आले. यामुळे ऐन पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाºया दुरुस्तीचे काम झाले नाही. महामार्गाच्या दुतर्फा केलेला मातीचा भराव, खोदकाम, यामुळे जुन्या रस्त्यावर ऐन पावसाळ्यात मातीचा चिखल आणि खड्डे तयार झाले. आजही ही दुरुस्ती पूर्ण न झाल्याने, रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
जागोजागी निर्माण केलेल्या पर्यायी मार्गावर डांबर शिल्लक राहिले नाही, यामुळे पर्यायी मार्गाचा चिखल रस्त्यावर आला आहे. जुना मार्ग आणि पर्यायी मार्गावरील डांबर निघून गेल्याने खड्डे निर्माण झाले आहेत. महाडजवळ दासगावपासून गांधारपाले, पुढे नातेखिंड ते नांगलवाडीपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यातून वाहने चालवताना वाहनचालकाला कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात टाकल्या जाणाºया भरावाची अवजड वाहनांमुळे वाट लागत आहे.

दुरवस्थेमुळे रुग्णांना त्रास
च्कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याचे निर्मूलन यावर शासनाने भर दिल्याने या विकासकामांकडे दुर्लक्ष केले आहे. कोकणातून रुग्णांना उपचारासाठी मुंबई किंवा अन्य ठिकाणी जाताना याच महामार्गाचा वापर करावा लागत आहे. मात्र, महामार्गाच्या दयनीय अवस्थेने रुग्णवाहिकेचे आणि रुग्णांचे हाल होत आहेत. वेळेवर रुग्ण रुग्णालयात
पोहोचत नसल्याने रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत.

Web Title: Mumbai-Goa Highway in Rutla Chikhalat; Driving distressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड