शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
2
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
3
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
4
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
5
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
6
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
7
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
8
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
9
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
10
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
11
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
12
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
13
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
14
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
15
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
16
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
17
"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
18
इस्रायलच्या 'या' एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार, 'खतरनाक' प्लॅन उघड
19
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
20
Gold Silver Rates : धनत्रयोदशीपूर्वी स्वस्त झालं सोनं; एका वर्षात ३० टक्क्यांनी वाढलाय भाव

मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथगतीने; चौपदरीकरण कधी पूर्ण होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 7:45 AM

पहिल्या टप्प्याचे प्रलंबित काम जैसे थे

सिकंदर अनवारेमहाड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. पहिला टप्पा पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असताना, दुसऱ्या टप्प्याचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. सद्यपरिस्थितीत कोकणात जाणाऱ्यांसाठी थोडाफार दिलासा मिळत असला तरी, काम पूर्णत्वाला कधी येणार, अशी विचारणा प्रवासी व नागरिकांतून व्यक्त होत आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. हे शिल्लक काम रखडण्याच्या मार्गावर आहे.

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन टप्प्यांत सुरू झाले. पहिला टप्पा पळस्पे ते इंदापूर आणि दुसरा टप्पा इंदापूर ते कोकणच्या तळातील धारपपर्यंत. पहिल्या टप्प्याचे काम सुरू होऊन दहा वर्षे पूर्ण झाली तरी काम अर्धवटच आहे. दुसरा टप्पा इंदापूर ते कोकणच्या तळातील धारप या गावहद्दीपर्यंत असून, त्याचे काम २०१७ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र आजच्या घडीला पाच वर्षे झाली तरी काम पूर्ण झाले नसून, फक्त ७० टक्के काम झाले आहे. ते १० टप्प्यांत असून, नऊ ठेकेदार कंपन्यांनी घेतले आहे. उर्वरित ३० टक्के काम कधी पूर्ण होईल, हा प्रश्न कायम आहे.

पहिला टप्पा इंदापूर ते वडपाले, दुसरा टप्पा वडपाले ते पोलादपूर भोगाव या टप्प्यामध्ये दासगाव ते वीर या ५ किलोमीटरच्या अंतराच्या मार्गासाठी वन खात्याच्या परवानगीसाठी प्रयत्न सुरू असले तरी अद्याप मंजुरी मिळालेली नाही. तिसरा टप्पा भोगाव ते कशेडी टनेल, चौथा टप्पा कशेडी ते परशुराम घाट, पाचवा टप्पा परशुराम घाट ते आरवली, सहावा टप्पा आरवली ते कानते, सातवा टप्पा कानते ते वाकड, आठवा टप्पा वाकड ते तळेगाव, नववा टप्पा तळेगाव ते कालमथ, दहावा टप्पा कालमथ ते धारप असा आहे. या टप्प्याचे जवळपास ३० टक्के काम शिल्लक आहे.

चौपदरीकरणाचा दुसरा टप्पा ३५५.२८० कि.मी.चा आहे. यावर ६१०० कोटी खर्च अपेक्षित असून, त्यापैकी २४०.८८ किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. ११४.३९९ किलोमीटर काम प्रलंबित आहे. आतापर्यंत ७३ टक्के काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यात काही ठिकाणी वन खात्याची परवानगी मिळालेली नाही.

दहा वर्षांत अडीच हजार जणांचे बळीया महामार्गासाठी ११ वर्षांपूर्वी १२०० कोटी खर्च होत होता; मात्र जसजसा कालावधी वाढत आहे, तसतशी त्याची रक्कम वाढत असून, सध्या ती दोन हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे. वाढीव खर्च टोलच्या माध्यमातून कोकणवासीयांच्या खिशातूनच वसूल केला जाणार आहे. गेल्या दहा वर्षांत या मार्गावर सुमारे २५०० नागरिकांचे प्राण गेले आहेत.