मुंबईतील कचरा समुद्रमार्गे रायगडमध्ये! कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्ह्यामध्ये यंत्रणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 06:41 AM2017-11-03T06:41:22+5:302017-11-03T06:41:35+5:30

मुंबईतील कच-याचा भस्मासुर समुद्रमार्गे रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी धडकत आहेत. त्यामुळे निर्सगाने नटलेल्या ऐतिहासिक जिल्ह्याचे विद्रूपीकरण होऊन त्याचा विपरीत परिणाम येथील पर्यटन उद्योगावर होत आहे.

Mumbai's Garbage via Raigad! There is no machinery in the district to dispose of the waste | मुंबईतील कचरा समुद्रमार्गे रायगडमध्ये! कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्ह्यामध्ये यंत्रणाच नाही

मुंबईतील कचरा समुद्रमार्गे रायगडमध्ये! कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्ह्यामध्ये यंत्रणाच नाही

Next

- आविष्कार देसाई

अलिबाग : मुंबईतील कच-याचा भस्मासुर समुद्रमार्गे रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी धडकत आहेत. त्यामुळे निर्सगाने नटलेल्या ऐतिहासिक जिल्ह्याचे विद्रूपीकरण होऊन त्याचा विपरीत परिणाम येथील पर्यटन उद्योगावर होत आहे. कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्ह्यामध्ये कोणतीच सक्षम यंत्रणा अस्तित्वात नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे शहर आहे. अलिबाग शहराला ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व आहे. त्याचप्रमाणे येथील नारळ-सुपारीच्या बागा, सुरूच्या बनाचे पर्यटकांना खूपच आकर्षण असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येत असतात. याचीच भुरळ पडल्याने विविध सिने अभिनेते-अभिनेत्री, रतन टाटा यंसारखे बलाढ्य उद्योजक, मद्य सम्राट विजय मल्या यांचे येथे टोलेजंग बंगले आहेत. मुंबईच्या धकाधकीच्या आणि प्रदूषणापासून दूर असणाºया अलिबाग तालुक्यात त्यांनी आपापले सेंकड होम येथे उभारलेले आहेत.
वीकेण्डला अथवा निवांत क्षण व्यतीत करण्यासाठी त्यांचे नेहमीच येथे येणे-जाणे असते.
मात्र, आता ज्या कचरा, प्रदूषण, धकाधकीच्या जीवनापासून दूर आलेल्यांना आता येथील समुद्रकिनारी येणाºया कचºयाची चांगलीच समस्या जाणवू लागली आहे.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर अद्यापही केला जात आहे. तो प्लास्टिक कचरा नद्यांच्या माध्यमातून समुद्राला मिळत आहे. अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायतीची हद्द समुद्रामध्ये निमुळती असल्याने समुद्रातील कचरा हा थेट तेथील किनाºयावर जमा होतो. त्याचप्रमाणे मांडवा हद्दीतील समुद्रकिनारीही कचरा मोठ्या प्रमाणात जमा होतो. समुद्रकिनारीच धनदांडग्याचे बंगले मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्यांना आता त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते.

१अलिबाग तालुक्यात पर्यटन वृद्धीसाठी विविध पर्यटन महोत्सवही आयोजित केले जातात. पर्यटकांना आवश्यक असणाºया सुखसोयी, विविध हॉटेल्स, रेस्टारंट, कॉटेज येथे मोठ्या संख्येने असल्याने पर्यटकांची येथे चांगलीच रेलचेल असते.
२वाढत्या पर्यटनामुळेही कचºयाचा प्रश्न आवासून उभा राहिला आहे. त्यातच स्थानिकही कचºयाचे योग्य नियोजन करीत नसल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.
३स्थानिक ग्रामपंचायतींकडे कचरा गोळा करण्याची यंत्रणा आहे. मात्र, त्या कचºयावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीच सक्षम यंत्रणा अस्तित्वात नाही.
४अलिबाग शहरासह आसपासच्या तब्बल ६२ ग्रामपंचायतींकडे डंपिग ग्राउंडच नसल्याने रोजच्या लाखो टन कचºयाची समस्या निर्माण झाली आहे.

किहीम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोजच्या रोज कचरा उचलण्याचा प्रयत्न केला जातो. येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने परिसर स्वच्छ ठेवण्यात येतो. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला आलेल्या उधाणामुळे मुंबईतील सर्व कचरा किहीम हद्दीतील समुद्रकिनारी सरकतो, असे किहीमच्या सरपंच शिल्पा साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
किहीम ग्रामपंचायतीप्रमाणेच अन्य ग्रामपंचायतींचीही समस्या आहे. लगतच्या पाच ग्रामपंचायतींना एकत्र करुन त्यांच्यामार्फत कचरा व्यवस्थापनासाठी चांगला प्रकल्प राबवता येऊ शकतो. यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी उभारल्यास प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी लोकमताल सांगितले.

Web Title: Mumbai's Garbage via Raigad! There is no machinery in the district to dispose of the waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.