एमजीएम रुग्णालयासोबत महापालिकेचा २०० आयसीयू बेडचा करार; पनवेलकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:44 AM2021-04-23T00:44:56+5:302021-04-23T00:45:02+5:30

सध्या एमजीएम रुग्णालय कामोठे येथे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत २५० बेड सुविधा उपलब्ध असून नवीन करारामुळे आणखी २००० आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत.

Municipal Corporation's agreement with MGM Hospital for 200 ICU beds; Consolation to Panvelkar | एमजीएम रुग्णालयासोबत महापालिकेचा २०० आयसीयू बेडचा करार; पनवेलकरांना दिलासा

एमजीएम रुग्णालयासोबत महापालिकेचा २०० आयसीयू बेडचा करार; पनवेलकरांना दिलासा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महानगरपालिकेचा कामोठे येथील एमजीएम रुग्णालयासोबत करार झाला असून त्यानुसार पालिकेसाठी २०० आयसीयू बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत.
सध्या एमजीएम रुग्णालय कामोठे येथे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत २५० बेड सुविधा उपलब्ध असून नवीन करारामुळे आणखी २००० आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या दररोज ५०० आरटीपीसीआर चाचण्या जे जे रुग्णालयात, तर २०० चाचण्या अलिबाग येथील प्रयोगशाळेत केल्या जात जात आहेत. चाचण्या करण्याची सुविधा अपुरी पडू लागल्यामुळे कोरोनाबाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांची मोफत आरटीपीसीआर टेस्ट करण्याकरिता दररोज ३०० टेस्ट एमजीएम रुग्णालयामार्फत मिळण्याकरिता करार करण्यात आला. त्याचप्रमाणे तेरणा मेडिकल कॉलेज यांच्याकडून सुद्धा दररोज ३०० आरटीपीसीआर टेस्ट मिळण्याकरिता करारनामा करण्यात आला. त्यामुळे पनवेल महापालिकेतील नागरिकांना उद्यापासून अधिकच्या ६०० आरटीपीसीआर टेस्ट मोफत करून मिळतील. त्यासोबतच आवश्यकतेप्रमाणे अँटिजन टेस्ट करण्यात येत आहेत.
एमजीएमसोबत करारनामा करतेवेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, आयुक्त सुधाकर देशमुख, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, गणेश कडू, उपायुक्त संजय शिंदे, वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी, एमजीएम रुग्णालयाचे ट्रस्टी सुधीर कदम आदी उपस्थित होते.
 

Web Title: Municipal Corporation's agreement with MGM Hospital for 200 ICU beds; Consolation to Panvelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.