शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

एमजीएम रुग्णालयासोबत महापालिकेचा २०० आयसीयू बेडचा करार; पनवेलकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:44 AM

सध्या एमजीएम रुग्णालय कामोठे येथे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत २५० बेड सुविधा उपलब्ध असून नवीन करारामुळे आणखी २००० आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महानगरपालिकेचा कामोठे येथील एमजीएम रुग्णालयासोबत करार झाला असून त्यानुसार पालिकेसाठी २०० आयसीयू बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत.सध्या एमजीएम रुग्णालय कामोठे येथे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत २५० बेड सुविधा उपलब्ध असून नवीन करारामुळे आणखी २००० आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या दररोज ५०० आरटीपीसीआर चाचण्या जे जे रुग्णालयात, तर २०० चाचण्या अलिबाग येथील प्रयोगशाळेत केल्या जात जात आहेत. चाचण्या करण्याची सुविधा अपुरी पडू लागल्यामुळे कोरोनाबाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांची मोफत आरटीपीसीआर टेस्ट करण्याकरिता दररोज ३०० टेस्ट एमजीएम रुग्णालयामार्फत मिळण्याकरिता करार करण्यात आला. त्याचप्रमाणे तेरणा मेडिकल कॉलेज यांच्याकडून सुद्धा दररोज ३०० आरटीपीसीआर टेस्ट मिळण्याकरिता करारनामा करण्यात आला. त्यामुळे पनवेल महापालिकेतील नागरिकांना उद्यापासून अधिकच्या ६०० आरटीपीसीआर टेस्ट मोफत करून मिळतील. त्यासोबतच आवश्यकतेप्रमाणे अँटिजन टेस्ट करण्यात येत आहेत.एमजीएमसोबत करारनामा करतेवेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, आयुक्त सुधाकर देशमुख, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, गणेश कडू, उपायुक्त संजय शिंदे, वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी, एमजीएम रुग्णालयाचे ट्रस्टी सुधीर कदम आदी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या