नगरपरिषदेने थकविली पाणीपट्टी

By admin | Published: March 17, 2016 02:27 AM2016-03-17T02:27:18+5:302016-03-17T02:27:18+5:30

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीसह महाड नगरपरिषदेकडे पाणीपट्टीची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे.

Municipal council tired water tank | नगरपरिषदेने थकविली पाणीपट्टी

नगरपरिषदेने थकविली पाणीपट्टी

Next

महाड : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीसह महाड नगरपरिषदेकडे पाणीपट्टीची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही संबंधितांकडून थकीत रकमा भरण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक थकबाकी महाड नगरपरिषदेकडे असून दंड व व्याजासह ही थक बाकीची रक्कम सुमारे ९ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचे महामंडळाच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
महाड नगर परिषदेसह औद्योगिक परिसरातील व खाडीपट्टा भागातील ग्रामपंचायतींना औद्योगिक महामंडळाकडून गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा केला जातो. महाड शहराच्या पूर्व भागाला गेल्या पंधरा वर्षांपासून याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महाड नगरपरिषदेकडे औद्योगिक महामंडळाने दंड व्याजासह ९ कोटी ३९ कोटी रुपयांची थकीत बाकी असली तरी नगरपरिषद आणि महामंडळामध्ये पाण्याच्या दरावरून गेली अनेक वर्षे वाद आहेत. प्रति हजारी ७ रुपये दराने महामंडळाकडून पाणी बिलाची आकारणी केली जात असून नगरपरिषदेला महामंडळाचा हा ७ रुपयांचा दर मान्य नाही. त्यामुळे दरमहा ७ रु. दराने आकारलेल्या बिलापोटी ३ रु. प्रति हजार लि. दराने नगरपरिषदेकडून अंडरप्रोटेस्ट बिलाची रक्कम नियमितपणे दरमहा भरण्यात येत आहे. वाढलेली थकबाकी ही दराच्या वादामुळे असली तरी यावर तोडगा न काढल्यास ही थकीत रक्कम वर्षानुवर्षे वाढतच राहणार आहे.
मंत्रालय पातळीवर याबाबत अण्णासाहेब सावंत नगराध्यक्ष असल्यापासून अनेकवेळा प्रयत्न केले गेले, मात्र महामंडळाकडून पाण्याचा दर कमी करण्यास असमर्थता दर्शविली आहे. दरमहा नगरपरिषदेकडून महामंडळाला पाणी बिलापोटी सुमारे सव्वा लाख रुपये ते दीड लाख रुपये नियमितपणे अदा केले जात आहेत.

ग्रामपंचायतीकडील थकबाकी महामंडळाकडून पुरवठा केल्या जाणाऱ्या आसनपोई ग्रामपंचायतीकडे १६ लाख ६१ हजार ५२५ रुपये, कांबळे ग्रामपंचायतीकडे १० लाख ८४ हजार रुपये, सवाणे ग्रामपंचायतीकडे १० लाख ५६ हजार इतकी थकबाकी असून नडगाव ७ हजार ९४७, सवाणे बौद्धवाडी ३ लाख ३३ हजार ६९२, जीते ३ लाख ५८७, बिरवाडी ६ लाख १० हजार ७७१.

३ कोटी ३४ लाख रुपयांची बिले
खरवली ७ लाख ७९ हजार ५७३, राजेवाडी ३ लाख ३२ हजार ७९६, कोल १६ हजार ६५०, दादली १ लाख ९० हजार ९५९, चोचिंदे १ लाख ३२ हजार २६०, गोठे बुद्रुक ५१ हजार ६४४, किंजळघर १ लाख ५३ हजार ५०५, वडवली २३ हजार ४८१, चोचिंदे १४ हजार ३६५, नडगाव १ लक्ष ३ हजार ६३३, कोल १९ हजार ३७८, सव बौद्धवाडी ९९ हजार ९४५, कोसबी २ हजार ७५०, जीते ६३ हजार ३६८, अशी सर्व ग्रामपंचायतींची व महाड नगरपरिषद मिळून ३ कोटी ३४ लाख रुपयांची पाणीपट्टीची बिले थकीत .

Web Title: Municipal council tired water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.