नांदगाव/ मुरूड : पाणीपुरवठा वितरित करणाऱ्या मशिन जळल्यामुळे मुरूड शहराला सलग चार दिवस पिण्याचे पाणी न मिळाल्यामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याचे दुसरे स्रोत उपलब्ध नसल्याने शहरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. यावर त्वरित उपाययोजना व्हावी व शहरातील पाणीटंचाई संपुष्टात यावी, यासाठी विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक, व नागरिकांनी नगरपरिषदेवर हल्लाबोल करत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आक्रमक पवित्रा घेऊन पाणीटंचाई संपुष्टात आणण्याची मागणी केली.या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर,नगरसेवक मनोज भगत, आशिष दिवेकर, बाबा दांडेकर, विश्वास चव्हाण, महेश कारभारी, विजय पैर, नितीन पवार, मानव अधिकारी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी, बाबू सुर्वे, जनार्दन खेडेकर, नाना गुरव, कोळी समाज अध्यक्ष मनोहर बैले आदींसह नागरिक उपस्थित होते. शिष्टमंडळास मुख्याधिकारी दयानंद गोरे, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, नगरसेवक विजय पाटील सामोरे गेले. यावेळी मंगेश दांडेकर यांनी मागील इतिवृत्तात नगरसेवक अविनाश दांडेकर यांनी बंद पडलेली मशिन दुरु स्त करण्याची मागणी केली होती; परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले, तीन मशिन असूनसुद्धा दुरु स्त केल्या गेल्या नाहीत किंवा वेळीच नवीन मशिन खरेदी न केल्याने प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मुरूड शहराला तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित के ला. वेळीच लक्ष न दिल्याने ही समस्या उद्भवली आहे. काही करा पण शहरातील पाणीटंचाई दूर करा, अशी आग्रही मागणी केली. (वार्ताहर)पाणीटंचाईची समस्या सोडवा -नागरिकांची मागणी चार दिवस पिण्याचे पाणी नसल्याने भोजन व अंघोळीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. काही करा; परंतु ही पाणीटंचाईची समस्या सोडवा, अशी मागणी या वेळी स्थानिकांनी केली. नगरसेवक अविनाश दांडेकर यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच पाणीटंचाई उद्भवली असल्याचे नमूद करून वेळीच उपाययोजना केली गेली असती तर हा प्रसंग आला नसता, असे म्हटले. नगरसेवक मनोज भगत यांनी तीन मशिन जळाल्या तरीसुद्धा लोकांना पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाने व्यवस्थित लक्ष दिले नाही. सहा महिन्यांपूर्वी मशिन बंद पडल्या मग एकसुद्धा मशिन दुरु स्त करता आली नाही? असा प्रश्न के ला.नवीन मशिन खरेदीसाठी प्रयत्न सुरू -प्रमोद भायदे च् शिष्टमंडळाला उत्तर देताना पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे म्हणाले की, शहरातील पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी तातडीचे प्रयत्न केले जात आहेत. शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी दोन नवीन मशिन नगरपरिषदेकडून खरेदी करण्यात येणार आहेत. जुन्या मशिनची दुरु स्ती केली आहे; परंतु त्यांनी पाणीपुरवठा व्यविस्थत न झाल्याने वेळेत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. च्शनिवारपर्यंत या मशिन बसविल्या जातील व तिथेच पाणीटंचाई संपुष्टात येईल, असा विश्वास व्यक्त केला. शहरातील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी तातडीने टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहेत. लोकांना पाणीटंचाई उद्भवू नये, यासाठी नगरपरिषद कार्यतत्पर असल्याची ग्वाहीसुद्धा यावेळी त्यांनी दिली. दोन नवीन मशिन त्वरित खरेदी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
मुरूड शहरात चार दिवसांपासून पाणी नाही!
By admin | Published: February 18, 2017 6:35 AM