नांदगाव/ मुरूड : मुरूड तालुक्यात शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस आय या तीन पक्षांची आघाडी होणार हे जवळ जवळ स्पष्ट होत आहे. मुरूड नगरपरिषद निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र लढून काँग्रेस आयचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत; परंतु आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची अटकळ मांडली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षात दोन विचारांची विभागणी झाली होती. काही आघाडीसोबत, तर काही शिवसेनेसोबत असे दोन गट पडले होते. त्यामुळे आघाडी होणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते; परंतु आता हा तणाव निवळला असल्याचे स्पष्ट दिसत असून काँग्रेस पक्षाचे काही मोजकेच लोक ही मागणी करत असल्याचे दिसून येत आहे.लवकरच काँग्रेस पक्षाची एक सभा होणार असून सर्व कार्यकर्त्यांचे विचार ऐकून आघाडीसोबत राहण्याचे निर्णय जाहीर होणार असल्याचेच विश्वसनीय वृत्त आहे. शिवसेनेसोबत चला म्हणणारे फार थोडेच लोक दिसून येत असल्याने काँग्रेसचा मोठा समुदाय मात्र आघाडी सोबतच राहण्यासाठी आग्रही असल्याने मोठ्या गटाचाच विजय होणार असून, काँग्रेस आय आघाडीत समाविष्ट होईल, असेच विश्वसनीय वृत्त मिळत आहे. काँग्रेस आय पक्षातील बहुसंख्य कार्यकर्ते आघाडी सोबत राहावे म्हणणारी संख्या मोठी आहे. त्यामुळे बहुसंख्येच्या बळावर काँग्रेस आघडीसोबतच राहील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मुरूड तालुक्यातील बोर्ली, मांडला व इतर गावातील लोकांचा आग्रह शिवसेनेसोबत आहे. तालुक्यातील बहुसंख्य गावांतील कार्यकर्ते आघाडीसोबत राहण्याचा आग्रह धरत आहेत. बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या जोरावर काँग्रेस पक्षाने कोणासोबत दोस्ती करावी? हा निर्णयाने सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे. पेण येथे शिवसेनेसोबत दोस्ताना जाहीर झाला आहे. त्यामुळे मुरूड तालुक्यातील काँग्रेस आय पक्ष कोणासोबत दोस्ती करणार? याबाबत उत्सुकता निर्माण होऊन आघाडीतील पक्षही यावर लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)
मुरूडमध्ये काँग्रेस आघाडी सोबतच?
By admin | Published: January 10, 2017 6:05 AM