मुरुड-दापोली-पुणे एसटी बसला अपघात, 25 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 02:50 PM2019-02-09T14:50:17+5:302019-02-09T15:14:48+5:30

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यांतील मुरुड येथून शनिवारी सकाळी सुटलेल्या मुरुड-दापोली-पुणे एसटी बसला महाड जवळच्या रेवतळे घाटात अपघात झाला आहे.

murud dapoli pune ST accident near mahad 25 injured | मुरुड-दापोली-पुणे एसटी बसला अपघात, 25 जण जखमी

मुरुड-दापोली-पुणे एसटी बसला अपघात, 25 जण जखमी

Next
ठळक मुद्देमुरुड-दापोली-पुणे एसटी बसला महाड जवळच्या रेवतळे घाटात अपघात झाला आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघात बसमधील एकुण 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रायगड जिल्ह्यातील महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जयंत धुळप

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यांतील मुरुड येथून शनिवारी सकाळी सुटलेल्या मुरुड-दापोली-पुणे एसटी बसला महाड जवळच्या रेवतळे घाटात अपघात झाला आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघात बसमधील एकुण 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रायगड जिल्ह्यातील महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 16 जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. अन्य जखमींना प्रथमोपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले आहे. घटनास्थळी सरकारी अधिकारी व एसटी महामंडळाचे अधिकारी दाखल झाले आहे.

महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या 16 प्रवाशांमध्ये, अक्षय सुबोध कासारे(23, रा.दावड,ता.मंडणगड-रत्नागिरी), प्रभाकर राजाराम गायकवाड(55, मु.वालेकरवाडी,चिंचवड-पूणो), उर्मिला लक्ष्मण बटावले (60,रा.मुरुड,ता.दापोली-रत्नागिरी), शिल्पा शरद केळकर (64,रा.), हेमलता संतोष मोरे (35, रा.दापोली), सुनंदा मारुता तांबट( 71, मु.दाभोळ-रत्नागिरी), मंगेश मारुती तांबट(53, रा,दाभोळ-रत्नागिरी),अंजुम अजीज सय्यद(44,रा.दापोली-रत्नागिरी),अशोक व्यंकटराव पवार(69, रा.सोंडेघर,दापोली), चारंबी खान (75,रा.महाबळेश्वर), फौजीया तनविर कोंडेकर(22, रा.शिरवली-महाड), अशोक तुकाराम येरुणकर(62,रा.शिरसेश्वर,दापोली), मीना चंद्रकांत कुसगांवकर(58,रा.दाभोळ-दापोली),राधिका कृष्णा बेणोरे (62,रा.मुरुड-दापोली), नारायण शंकर पवार (53, रा.मुरुड-दापोली) आणि चंद्रकांत लहू कुसगांवकर (69,रा.दाभोळ -दापोली) यांचा समावेश आहे.

Web Title: murud dapoli pune ST accident near mahad 25 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.