मुरुडमध्ये वीज ग्राहकांकडे साडेसहा कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 11:51 PM2021-03-12T23:51:30+5:302021-03-12T23:51:45+5:30

महावितरण कर्मचाऱ्यांची वसुलीसाठी ग्राहकांच्या घरोघरी पायपीट

In Murud, electricity consumers owe Rs 6.5 crore | मुरुडमध्ये वीज ग्राहकांकडे साडेसहा कोटींची थकबाकी

मुरुडमध्ये वीज ग्राहकांकडे साडेसहा कोटींची थकबाकी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आगरदांडा : वीजबिल वसुलीमध्ये अग्रेसर असणाऱ्या मुरुड तालुक्यात २५ हजार ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे तालुक्यात सध्या ६ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. निव्वळ खासगी ग्राहकांचे नाही, तर सरकारी बिलांची थकबाकीही वाढली आहे. कोरोना कालावधीत अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या महावितरणपुढे कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

मुरुड तालुक्यात सर्वाधिक २० हजार घरगुती ग्राहक असून, त्याची १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी, व्यावसायिक २ हजार ५०० ग्राहक असून, त्याची ५० लाख रुपये थकबाकी, इतर ग्राहकांची १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी मार्चपासून काही ग्राहकांनी वीजबिले न भरल्यामुळे थकबाकीची रक्कम वाढली आहे. महावितरणकडून वेळोवेळी आवाहन करूनही ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद लाभत नसल्याने थकबाकीचे आकडे वाढले आहेत. महावितरणची मुरुड तालुक्यातील वीज ग्राहकांकडे ६ कोटी ५० लाख रुपये थकबाकी असल्याने महावितरणने वसुली मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यत ३ कोटी ३५ लाख रुपये वसुली झाले असून, ३ कोटी १५ लाख रुपये थकीत आहेत असल्याचे महावितरणचे उपकार्य अभियंता - सचिन येरेकर यांनी सांगितले. कोरोनामुळे एक वर्षे लॉकडाऊन होता. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायासह सर्वसामान्यांना घरात बसून पोट भरावे लागले. शासनाने कोरोना काळातील विजबिले काही प्रमाणात माफ करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ग्राहकांनी विजबील माफ होण्याची वाट पाहत बसल्याने वीज ग्राहकांकडे वर्षापासूनची विजबीले थकीत राहून गेली आहेत. दरम्यान, शासनाने वीजबिले माफ होणार नसल्याची घोषणा केल्यानंतर थकीत वीजबिलधारकांचे वीजबिल भरण्याचे शासनाने आदेश दिले.

आतापर्यंत ५०० वीज कनेक्शन तोडण्यात आले
nबील एकाच वेळी भरणे ग्राहकांना अशक्य असल्याने हप्त्यांमध्ये भरण्याची ग्राहकांना सवलत महावितरणतर्फे देण्यात आली होती. कोरोना काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अखंडित वीजपुरवठा ठेवला होता. 
nग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहान करूनही वीजबिल भरली जात नसल्याने, महावितरणाचे ७० कर्मचारी रोजच्या रोज वसुलीसाठी घरोघरी जाऊन ग्राहकांना वीजबिल भरण्यास विनवणी करीत आहेत. घरी गेल्यानंतर वीजबिल भरले नाही, तर त्याना पुन्हा त्यांना वेळ दिली जात आहे. 
nवेळ देऊनही थोडेफार वीजबिल भरणा न केल्याने आतापर्यंत नाईलाजाने ५०० वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. तालुक्यातील वीज ग्राहकांनी लवकरात लवकर वीजबिल भरून महावितरणाला सहकार्य करा, असे आवाहन मुरुड उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी केले आहे.

Web Title: In Murud, electricity consumers owe Rs 6.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड