मुरुडला वादळी पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 02:26 AM2017-12-05T02:26:45+5:302017-12-05T02:26:45+5:30
ओखी चक्रीवादळाचा फटका मुरुड तालुकालाही सहन करावा लागला आहे. दिवसभरात ढगाळ वातावरण होते, सायंकाळी अचानक जोरदार वा-यासह पावसाला सुरु वात झाल्याने विद्यार्थी व सामान्य नागरिकांची धावपळ उडाली.
आगरदांडा / बोर्ली मांडला : ओखी चक्रीवादळाचा फटका मुरुड तालुकालाही सहन करावा लागला आहे. दिवसभरात ढगाळ वातावरण होते, सायंकाळी अचानक जोरदार वा-यासह पावसाला सुरु वात झाल्याने विद्यार्थी व सामान्य नागरिकांची धावपळ उडाली.
दुपारपासून समुद्रात मोठ्या लाटा येऊ लागल्यामुळे समुद्रलगत असणारा कोळी बांधव घाबरून गेला होता. वादळाच्या भीतीने मुरु ड तालुक्यातील कोळी बांधव मासेमारीला न जाता आपआपल्या होड्या किनाºयावर नांगरून ठेवल्या. वादळी पावसामुळे पशुपक्ष्यांची किलबिल शांत झाली होती. ओखी चक्रीवादळाच्या भीतीने पर्यटकांची संख्या रोडावली, यामुळे स्थानिक उद्योगधंद्यावर याचा परिणाम झाला. सायंकाळी अचानक पाच वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू होऊन वीज गायब झाली होती. अनेक तास उलटून गेले तरी ती आली
नव्हती.
सध्या मुरु ड शहरातील दत्त मंदिर डोंगरावर तीन दिवसीय यात्रा सुरु असून अचानक पडलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. तसेच अनेक तास टेलिफोनची नेट सेवा ही विस्कळीत झाली होती. काही ठिकाणी जलवाहतूक बंद असल्याने अनेकांचा प्रवास रखडला होता.
मुरु ड तालुक्यातील बोर्लीमांडला, कोर्लई, वळके, नांदगाव, चेहर, सुपेगाव आदी परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. बोर्ली येथे जोरदार पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसाने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. अचानक पडलेल्या पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन व्यवसाय ठप्प झाला.
सर्व बोटी सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्या आहेत. किनारपट्ट्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज झाली असून त्या दृष्टीने उपाययोजना सुरू आहेत.
वादळी पाऊस
१अलिबाग : ‘ओखी’ वादळामुळे पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता तो खरा ठरला आहे. रायगड जिल्ह्यातील काही विभागांमध्ये वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रायगड जिल्ह्यामध्ये दिवसभर हवामान ढगाळच होते. वातावरणात काही प्रमाणात उष्णता जाणवत होती. सायंकाळी अचानक काळोख झाला आणि जोरदार सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्याच्या जोडीला पावसाने हजेरी लावली.
२सायंकाळी शाळा, सरकारी कार्यालये, न्यायालय, बँका, विविध निमशासकीय, खासगी कार्यालये सुटण्याची वेळ असल्याने अचानक सुरू झालेल्या पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. अलिबाग : ‘ओखी’ वादळामुळे पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता तो खरा ठरला आहे. रायगड जिल्ह्यातील काही विभागांमध्ये वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
३रायगड जिल्ह्यामध्ये दिवसभर हवामान ढगाळच होते. वातावरणात काही प्रमाणात उष्णता जाणवत होती. सायंकाळी अचानक काळोख झाला आणि जोरदार सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्याच्या जोडीला पावसाने हजेरी लावली. सायंकाळी शाळा, सरकारी कार्यालये, न्यायालय, बँका, विविध निमशासकीय, खासगी कार्यालये सुटण्याची वेळ असल्याने अचानक सुरू झालेल्या पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली.