मुरुडमध्ये सर्वाधिक 208 मिमी पावसाची नोंद
By admin | Published: June 26, 2017 03:42 PM2017-06-26T15:42:37+5:302017-06-26T15:42:37+5:30
सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक 208 मिमी पावसाची नोंदद मुरुड येथे झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत/जयंत धुळप
मुरूड, दि. 26- सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक 208 मिमी पावसाची नोंदद मुरुड येथे झाली आहे. तर जिल्ह्यातील इतर भागातही रविवारपासून मूसळधार पाऊस झाला. तळा भागात 140 मिमी, रोह्यात 138 मिमी, अलिबागमध्ये मिमी133, पाली(सुधागड)123 मिमी, उरण-110मिमी, माणगांव-106मिमी, पोलादपूर 99मिमी, कर्जत 73.10मिमी, खालापूरात 68, पेण 55.40, पनवेल 53, श्रीवर्धन 53, म्हसळा 47, महाड43, आणि गिरिस्थान माथेरान येथे 38.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासातील जिल्ह्याचं सरासरी पर्जन्यमान 93.02 मिमी आहे.
रविवारी अंबा आणि कुंडलिका नद्यांच्या जलपातळीत वाढ झाली होती, परिणामी या दोन्ही नद्यांच्या तीरावरील एकुण 16 गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला तसंच आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. मात्र संध्याकाळी दोन्ही नद्यांच्या पातळीत घट झाल्याने संभाव्य धोका टळला असल्याचं रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं आहे. जिल्हयातील सावित्री, गाढी,पाताळगंगा,उल्हास या उर्वरित नद्यांची पातळी नियंत्रणात आहे. तसंच कोकण रल्वेची वाहतूकदेखील सुरळीत सुरु आहे. तर गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे दृतगती महामार्ग व मुंबई-पुणे जूना महामार्ग या मार्गांवरील वाहतूकदेखील सुरळीत सुरु असल्याचं त्यांनी सांगीतलं.
दरम्यान सोमवार २६ जून २०१७ रोजी सकाळी नऊ वाजल्या पासून पूढील १२० तासात कोकणातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यानूसार जिल्ह्यात आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचं सागर पाठक यांनी सांगितलं.