मुरूड दुर्घटनेप्रकरणी पॅराशूट चालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 05:57 AM2019-05-27T05:57:30+5:302019-05-27T05:57:35+5:30
शनिवारी झालेल्या पॅराशूट दुर्घटनेप्रकरणी सागर प्रदीप चौलकर या पॅराशूट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरूड : येथे शनिवारी झालेल्या पॅराशूट दुर्घटनेप्रकरणी सागर प्रदीप चौलकर या पॅराशूट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॅराशूट उडविण्यासाठी वापरलेले वाहनही रविवारी मुरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुण्याच्या कसबापेठेतील सात जणांचा समूह मुरूड समुद्रकिनारी पर्यटनासाठी आला होता. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास गणेश लक्ष्मण पवार (४०) व त्यांचा मुलगा वेदान्त (१५) एका पॅराशूटने हवाई सफारीची मजा घेत होते. मात्र, अचानक ते जमिनीवर आपटल्याने दोघेही जखमी झाले. त्यांना तातडीने अलिबाग येथील सिव्हिल रुग्णालयात नेले असता वेदान्तला मृत घोषित करण्यात आले.
तपास अधिकारी जे.डी. लवटे यांनी सांगितले की, दोषींविरुद्ध कडक कारवाई करू. जखमी गणेश पवार यांना पुढील उपचारांसाठी अलिबागहून पुणे येथील संचिती रुग्णालयात नेण्यात आले आहे.