मुरुड पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 06:25 AM2017-12-10T06:25:39+5:302017-12-10T06:25:57+5:30
राज्य शासनाकडून ग्रामीण विकास योजनेअंतर्गत मुरु ड पंचायत समितीची नवीन इमारत पूर्ण झाली असून, राज्य शासनाने इमारत होण्यासाठी पैसे दिले; परंतु नवीन इमारतीत लागणा-या विविध साहित्यासाठी पैसेसुद्धा पंचायत समितीला द्यावे, अशी मागणी आमदार पंडित पाटील यांनी...
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : राज्य शासनाकडून ग्रामीण विकास योजनेअंतर्गत मुरु ड पंचायत समितीची नवीन इमारत पूर्ण झाली असून, राज्य शासनाने इमारत होण्यासाठी पैसे दिले; परंतु नवीन इमारतीत लागणाºया विविध साहित्यासाठी पैसेसुद्धा पंचायत समितीला द्यावे, अशी मागणी आमदार पंडित पाटील यांनी मुरु ड पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी केली आहे. या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, जिल्हा परिषद सदस्या नम्रता कासार, राजश्री मिसाळ, सभापती नीता घाटवळ, उपसभापती प्रणिता पाटील, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मोहिते, आशिका ठाकूर, गटविकास अधिकारी संजय चव्हाण, तालुका चिटणीस मनोज भगत, नायब तहसीलदार रमेश म्हात्रे, शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश घाटवळ, अजित कासार, काँग्रेस आय पक्षाचे तालुकाअध्यक्ष सुभाष महाडिक आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले, मी जिल्हापरिषद अध्यक्ष असताना पंचायत समितीचे भूमिपूजन झाले होते.आता उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे. त्या वेळचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनीसुद्धा या इमारतीस मोठे सहकार्य केल्याचा उल्लेखही या वेळी त्यांनी केला. मुरु ड पंचायत समितीच्या नवीन इमारतीस सर्व साहित्य मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेने सहकार्य करावे, तसेच सेवाभावी संस्थांचे सहकार्य घेण्याचे आवाहनसुद्धा या वेळी त्यांनी केले. मुरु ड तालुक्यातील बहुतांशी रस्ते पूर्ण झाले असून, लवकरच मुरु ड शहराच्या विकासाकडे लक्ष देणार आहे. मुरुड नगरपरिषदेच्या स्वागतकमानीकरिता आवश्यक निधी राज्य शासनाकडून मिळवून देऊ, असे आश्वासन या वेळी पाटील यांनी दिले.
मुरु ड हे पर्यटनस्थळ आहे, अशा पर्यटनस्थळास विशेष करून मुरु ड शहरास विशेष निधी द्यावा, यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. मुरु ड दरबार हॉलसाठी माजी बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी ३० लाख रु पयांचा निधी दिला असून, दरबार हॉलचे सुशोभीकरण लवकरच होणार आहे. तसेच तहसील कार्यालयाची नवीन इमारत होण्यासाठी शासनाकडून आपले विशेष प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या इमारतीस राज्य शासनाच्या ग्रामीण विकास योजनेअंतर्गत १ कोटी ८७ लाख रु पये प्राप्त झाले होते. सदरची इमारत सुबक झाली असून, उत्तम पद्धतीने रंगरंगोटी करण्यात आली आहे.