मुरूड ते साळाव रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश
By admin | Published: January 5, 2017 06:03 AM2017-01-05T06:03:53+5:302017-01-05T06:03:53+5:30
गतवर्षी मुसळधार पावसाने मुरूड ते साळाव या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. येथून ये-जा करताना नागरिक तसेच पर्यटकही हैराण झाले होते
नांदगाव/ मुरूड : गतवर्षी मुसळधार पावसाने मुरूड ते साळाव या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. येथून ये-जा करताना नागरिक तसेच पर्यटकही हैराण झाले होते. ही समस्या लक्षात घेऊन, आ. जयंत पाटील यांनी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून, मुरूड ते साळाव रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश केल्याने लवकरच हा ३२ किलोमीटरचा रस्ता दुपदरी, तसेच उत्कृष्ट बनणार आहे. यामुळे मुरूडकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात गेल्याने रु ंदीकरण व मजबुतीकरण करण्याच्या कामाला वेग प्राप्त होणार आहे.
याबाबत स्थानिक आमदार पंडित पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, या रस्त्याला नुकतीच तत्त्वता मान्यता मिळाली असून, या रस्त्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी दिल्ली दरबारी खेपा मारून, हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात घेण्याचा पाठलाग केल्यानेच हे शक्य झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता गेल्याने रस्त्याचा दर्जा चांगला राहणार असून, रु ंदीकरण होण्यास मदत होणार आहे. या रस्त्यामुळे मुरूड तालुक्यात नांदगाव येथील अरुं द रस्त्यावर वाहतूककोंडी होत होती. आता हा रस्ता बाह्य मार्गाने काढून मुरूड-मुंबई हे अंतर खूप कमी होणार आहे, अशी माहिती या वेळी आमदार पाटील यांनी दिली.अर्थसंकल्पातून सुमारे एक कोटीपेक्षा जास्त निधी मुरूड शहरातील परेश हॉटेल ते डोंगरी हा रस्ता मंजूर केल्याचे सांगितले.