मुरूड तालुक्यात १४ उमेदवारांचे अर्ज मागे
By admin | Published: February 15, 2017 04:46 AM2017-02-15T04:46:37+5:302017-02-15T04:46:37+5:30
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. त्याकरिता मुरु ड तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या
आगरदांडा/ नांदगाव/मुरुड : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. त्याकरिता मुरु ड तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी, तर पंचायत समितीच्या ४ जागांसाठी निवडणूक होत आहे. पंचायत समितीसाठी १८, तर जिल्हा परिषदेसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ७, तर पंचायत समितीच्या ७ अशा १४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत पाहवयास मिळणार आहे.
उसरोली गटातून वृषाली कचरेकर, चैताली ठाकू र, रेश्मा मिसाळ, भाजपाच्या मुख्य उमेदवार कामिनी अंबाजी तर नांदगाव गणातून तारा वाघमारे, अश्विनी जाधव, राजपुरी गटातून अनुष्का कचरेकर, संजीवनी कासार, सेजल घुमकर, राजपुरी गणातून मंदा ठाकूर, पूजा वारगे, वळके गणातून जीवन सुतार, विजय सुतार, उसरोली गणातून आदिती लाड या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र वाघ यांनी दिली. जिल्हा परिषदेसाठी पाच उमेदवार व पंचायत समितीसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. उसरोली गटातून दुरंगी लढत होणार आहे. शिवसेनेकडून राजश्री मिसाळ, शेकाप भारती बंदरी उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे.