माझ्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचे श्रेय जनतेचेच - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 05:10 PM2018-03-11T17:10:41+5:302018-03-11T18:28:19+5:30

पन्नास वर्ष संसदिय कामकाज करण्याची संधी त्या जनसामान्यांनी मला दिली

My 50 years of political career is just like the people - Sharad Pawar | माझ्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचे श्रेय जनतेचेच - शरद पवार

माझ्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचे श्रेय जनतेचेच - शरद पवार

Next

जयंत धुळप

रायगड (रोहा) -  माझ्या पन्नास वर्षाच्या संसदीय कारकिर्दीचे श्रेय्य जनसामान्य जनतेचेच आहे. पन्नास वर्ष संसदिय कामकाज करण्याची संधी त्या जनसामान्यांनी मला दिली असल्याने खरतर त्या जनसामान्यांचा सत्कार होणे गरजेचे आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांनी रविवारी रोहा येथे बोलताना केले आहे. विधानपरिषद, विधानसभा, राज्यसभा,लोकसभा, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री असा तब्बल पन्नास वर्षाचा संसदिय कामकाजाचा प्रदिर्घ कालखंड खा.शरद पवार यांनी पुर्ण केल्याचे औचित्य साधून रोहा येथे आयोजित रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात,त्यांना चांदिची तलवार रोहा नगरिचे नगराध्यक्ष सतोष पोटफोडे व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांच्या हस्ते भेट देवून शानदार सत्कार करण्यात आला.

जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणि सन्मानाचे जीवन येणे आवश्यक

खा.पवार पूढे म्हणाले, मला राजकारणात मिळालेली संधी ही महाराष्ट्रातील जनतेमुळे मिळाली आहे.राजकारण करत असताना संकटे येतच असतात परंतु सामान्य जनतेशी असलेली बांधिलकी शेवटपर्यंत जपली पाहिजे. समाजातील सर्वात लहान माणसाच्या जीवनात परिवर्तन आणून त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव प्रयत्नशील राहील.  महाराष्ट्र हे छत्नपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले ,सावित्नीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,यशवंतराव चव्हाण यांचे राज्य असल्याचे त्यांनी नमुद केले. 

योग्य व्यक्तींच्या हाती देशाची व राज्याची सूत्ने सोपविण्यासाठी सर्वानी सज्ज होणो गरजेचे 

देशातील व राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीवर बोलतना खा.पवार पूढे म्हणाले,महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. रायगड जिल्ह्यातील जनता देखील जेथे कर्तृत्व दिसेल त्याच्या पाठीशी जातपात न मानता ठामपणो उभी राहते. योग्य व्यक्तींच्या हाती देशाची व राज्याची सूत्ने सोपविण्यासाठी सर्वानी सज्ज होणो गरजेचे आहे. शेतकरी कामगार पक्ष हा जिल्ह्यातील महत्वाचा पक्ष असून रायगड जिल्ह्यातील शेकाप-राष्ट्रवादी आघाडी जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी देईल असा विश्वास खा.पवार यांनी अखेरीस व्यक्त केला.

राज्य आणि देशाच्या राजकारणात शरद पवार यांना सर्वपक्षीयांत मानाचे स्थान- आ.सुनील तटकरे

राष्ट्रवादी काँघ्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांनी खा.शरद पवार यांच्या विद्यार्थी चळवळ ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि पुढील संसदिय कारिकर्दीचा अभ्यासपूर्ण आढावा घेताना, राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार यांना सर्वपक्षीयांत मानाचे स्थान असल्याचे सांगितले. रायगड जिल्ह्यातील खोडिकडा निर्मुलन करु न भातशेती वाचवणारे कृषीमंत्नी पवार येथील शेतकरी विसरु शकत नाही, तर शेतकर्यांच्या व्याज माफीचा निर्णय घेणारे पहिले मुख्यमंत्नी ते आहेत. स्वाभिमानाशी कधीही तडजोड त्यांनी केली नाही.त्यांच्याच नेतृत्वाखाली पहिली शेतकरी दिंडी नागपुरात थडकली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्नी ए.आर.अंतुले यांना शेतकरी कर्ज माफीचा निर्णय घ्यावा लागला होता. स्त्नीयांना आरक्षण देण्याचा अत्यंत पुरोगामी विचार राज्यात प्रथम त्यांनी अमलात आणला परिणामी आज महिलांना मोठा सन्मान प्राप्त होवू शकला आहे.महिलांना संरक्षण दलात संधी देण्याचा क्र ांतीकारी निर्णय त्यांनी संरक्षण मंत्री असताना घेतला परिणामी आज तिनही संरक्षण दलात महिला यशस्वी होताना दिसुन येत आहेत. देशाचे कृषीमंत्नी झाल्यावर भाताला प्रथमच मिळालेला विक्रमी दर आणि अन्नधान्य निर्यातीत त्यांनी करु न दाखविलेली वृद्धी ही त्यांच्या यशस्वी कारकिर्द जनसामान्यांच्या मनात रुजलेली आहे. आणि  म्हणूनच कोकण आपल्या पाठीशी आहे, हे सांगण्यासाठी आज ही जनता येथे आली असल्याचे नमुद करुन येत्या काळात लोकसभेचा उमेदवार कोणीही असो आपलाच उमेदवार निवडून येणार. सध्याचा काळ संक्र मणाचा आहे. राष्ट्रवादी बद्दल विश्वास वाढत आहे. परिणामी ईतर पक्षातुन नेते कार्यकर्ते आपल्या पक्षात येत असल्याचे तटकरे यांनी अखेरीस सांगीतले.

कुंडलिका नदि संवर्धन प्रकल्पाचे खा.पवार यांच्या हस्ते भूमीपूजन

दरम्यान सत्कार सोहोळ्य़ाच्या आधी रोहा शहराच्या विकासात मानबिंदू ठरणा:या 33 कोटी रुपये खर्चाच्या कुंडलिका नदि संवर्धन प्रकल्पाचा आणि 14 कोटी रुपये खर्चाच्या नविन वाढीव पामीपुरवठा योजनेचा भूमीपूजन सोहोळा खा.पवार यांच्या हस्ते करण्यात आला. मेळाव्यास  प्रमुख मान्यवर म्हणून आ.सुरेश लाड,आ.निरंजन डावखरे ,आ.अनिल तटकरे ,रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, राजिप अध्यक्षा आदिती तटकरे,पंचायत समीती सभापती विना चितळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर ,तालुका अध्यक्ष मधुकर पाटील,सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत तटकरे ,राजिप सभापती नरेश पाटील व उमा मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल,महिला जिल्हाध्यक्ष दीपिका चिपळूणकर आदि मान्यवर उपस्थित होते.

किसान मोर्चाला राष्ट्रवादी कॉग्रेसचा पाठिंबा

  किसान मोर्चाला राष्ट्रवादी कॉग्रेसने पाठिंबा दिला असुन सोमवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व धनंजय मुंठे मोर्चात सहभागी होतील अशी माहिती खा. पवार यांनी कार्यक्रमानंतर पत्नकारांशी बोलताना दिली आहे.

Web Title: My 50 years of political career is just like the people - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.