डॉल्फिनच्या मृत्यूचे गूढ उकलेना
By admin | Published: September 12, 2015 10:47 PM2015-09-12T22:47:52+5:302015-09-12T22:47:52+5:30
समुद्री पर्यावरणाचा समतोल आणि समृद्धतेचा प्रत्यय डॉल्फिनच्या अस्तित्वावरून येतो. मात्र, बोर्डी परिसरातील चिखले समुद्रकिनारी आॅगस्टअखेरीस चार आणि गुरुवार
बोर्डी : समुद्री पर्यावरणाचा समतोल आणि समृद्धतेचा प्रत्यय डॉल्फिनच्या अस्तित्वावरून येतो. मात्र, बोर्डी परिसरातील चिखले समुद्रकिनारी आॅगस्टअखेरीस चार आणि गुरुवार, १० सप्टेंबर रोजी आठ फुटी लांबीचा एक मृत डॉल्फिन आढळल्याने ही बाब समुद्र पर्यावरणाकरिता धोक्याची नांदी असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
किनाऱ्यावर मृत आढळलेल्या पाचही डॉल्फिनची विल्हेवाट वन विभागाने लावली आहे. मात्र, मृत्यूचे घटनासत्र का घडते, याबाबत सक्षम यंत्रणा नसल्याने स्थानिक पातळीवर अधिक माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. मासेमारी हंगामाच्या प्रारंभी खोल समुद्रात स्फोट घडवून अथवा अन्य मार्गाचा वापर करून डॉल्फिनला लक्ष्य केले जाते. ज्यामुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये भीती निर्माण होईल, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. डॉल्फिनच्या मृत्यूचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतरही प्रशासनाकडून अधिकृत माहिती दिली जात नसल्याबद्दल नागरिकांत रोष आहे. (वार्ताहर)
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा अप धीम्या मार्गासह हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द मार्गावर रविवारी स. ११ ते दु. ३ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे मुलुंड-माटुंगा अप मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत फलाटांअभावी नाहूर, कांजुरमार्ग, विद्याविहार स्थानकांत लोकल उपलब्ध नसतील. हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द मार्गावर ब्लॉक असल्याने त्या वेळेत सीएसटीहून वाशी/बेलापूर/पनवेल स्थानकांदरम्यानची लोकल सेवा अप/डाऊन दिशांवर रद्द करण्यात येणार आहे. तसेच सीएसटी-कुर्ला आणि पनवेल-मानखुर्द मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना आहे त्याच तिकीट व पासावर स. १० ते संध्या. ४ या वेळेत ट्रान्स हार्बरमार्गे प्रवासाची मुभा असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)