नागोठणे-शिहू रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:20 AM2017-07-29T02:20:08+5:302017-07-29T02:20:08+5:30

येथून रिलायन्स कंपनीमार्गे पोयनाडकडे जाणाºया मार्गात नागोठणे ते शिहू दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त केली जात आहे

naagaothanae-saihauu-rasatayaacai-dauravasathaa | नागोठणे-शिहू रस्त्याची दुरवस्था

नागोठणे-शिहू रस्त्याची दुरवस्था

Next

नागोठणे : येथून रिलायन्स कंपनीमार्गे पोयनाडकडे जाणाºया मार्गात नागोठणे ते शिहू दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणपती सणापूर्वी रस्त्याचे खड्डे भरण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नागोठणे-पोयनाड हा २६ कि.मी. लांबीचा मार्ग सार्वजनिक बांधकाम खाते, अलिबाग यांच्या अखत्यारीत आहे. या मार्गात पोयनाड ते गांधे दरम्यानचा रस्ता सुस्थितीत ठेवण्यात आला असला, तरी गांधेचे पुढे असणाºया शिहूपासून नागोठणेपर्यंतच्या रस्त्याची अनेक ठिकाणी दैनाच उडाली असल्याने वाहनचालक, तसेच नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गात रिलायन्सचा महाकाय प्रकल्प असून या ठिकाणी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. रिलायन्सने हा रस्ता सुधारावा, असासुद्धा सूर येथे आळवला जात असल्याने याबाबत रिलायन्सच्या व्यवस्थापनाशी विचारणा केली असता, हा रस्ता आमचा नसल्यामुळे तो तयार करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे विचाराधीन नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
शिहूचे सरपंच भास्कर म्हात्रे, काँग्रेसचे नेते वसंत मोकल यांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता पूर्वी रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात होता. पूर्वीच्या आयपीसीएलने (आताची रिलायन्स एनएमडी) २००७-०८ च्या दरम्यान हा रस्ता स्वखर्चाने तयार करून घेतला होता. आता हा प्रकल्प रिलायन्सच्या ताब्यात गेल्याने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सीएसआर फंडातून या रस्त्याची त्यांनी सुधारणा करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हा रस्ता १५ आॅगस्टपूर्वी सुस्थितीत आणावा, अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा पवित्रा उचलला जाईल, असे वसंत भोईर यांनी सांगितले.

Web Title: naagaothanae-saihauu-rasatayaacai-dauravasathaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.