अलिबाग - नागपंचमीनिमित्त रायगड जिल्ह्यातील आवास येथील श्री नागेश्वराच्या मंदिरात दंर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. नागेश्वर हे नागोबाचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. गावात आलेल्या बुधोबा साधूंच्या अंगावर शेषनाग खेळत असे. त्यामुळे आवास येथील मंदिरात भाविकांनी सोमवारी पहाटेपासूनच गर्दी केली होती.नागोबा साधूने गावात ज्या ठिकाणी समाधी घेतली त्याच ठिकाणी नागाची लाकडी प्रतिकृति अवतीर्ण झाली तेथे मंदिर बांधण्यात आले अशी नागेश्वराची आख्यायिका सांगितली जाते.
नागेश्वर नवसाला पावतो अशी परिसरातील भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी नागपंचमी भरणार्या यात्रेत परिसरातील हजारो भाविक नागेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे येथील स्थानिकांना छोट्या प्रमाणात रोजगार हि उपलब्ध होतो. श्रावण महिण्यात येणारा हा पहीलाच सण असल्याने नागरीक मोठ्या संख्येने नागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. आज पहाटे पाच वाजल्यापासूनच नागदेवतेच्या पुजेस प्रारंभ होतो. याबरोबरच आज नागेश्वर मंदिर परीसरात 1 दिवसाचे जत्रा हि भरते. या जत्रेस हाजेरी लावण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक गर्दी करतात.
आवास येथील नागेश्वर मंदिराच्या समोर दुर्वा, बेल, फुल यांसह मिठाईची दुकाण हि थाटण्यात आली होती. त्यामुळे येथील मंदिराबाहेर यात्रेचे स्वरुप हि प्राप्त झाले आहे. त्यामुळे दिवसरभ नागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची रेलचेल होती. तर सिद्धेश्र्वर, कनकेश्वर, गोकुळेश्वर, काशी विश्वेश्वर, हारीहरेश्वर यासह जिल्ह्यातील 112 मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती.