राबगाव/पाली : सुधागड तालुक्यात बिबट्याची नखे विकणाऱ्या दोघांना वनविभागाच्या अधिका-यांनी सोमवारी सापळा रचून पकडले. त्यांना १८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.पाली येथे बिबट्याच्या नखांची विक्री होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार, सोमवारी अलिबाग उप-वनरक्षकांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने पाली स्टेट बँकेजवळील मोकळ्या जागेत सापळा रचला. त्या वेळी महादेव वरगडे याची तपासणी केली असता, त्याच्याजवळ बिबट्याची अकरा नखे आढळून आली. वरगडे याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने ही नखे सखाराम फसाळे (रा. दर्यागाव, ता. सुधागड) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर फसाळे यालाही ताब्यात घेतले. वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी फसाळे व वरगडे यांना १८ डिसेंबरपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बिबट्याची नखे विकणारे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 5:38 AM