निसर्ग संवर्धनात पर्यावरण अभ्यास महत्त्वाचा-कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:11 AM2017-07-30T02:11:57+5:302017-07-30T02:11:57+5:30
विज्ञान आणि पर्यावरणाचा अभ्यास निसर्ग संवर्धनात महत्त्वाचा असल्याचे मार्गदर्शन सिस्केपचा सदस्य प्राणिमित्र प्रणव कुलकर्णी यांनी महाड तालुक्यातील शिक्षकांच्या
महाड : विज्ञान आणि पर्यावरणाचा अभ्यास निसर्ग संवर्धनात महत्त्वाचा असल्याचे मार्गदर्शन सिस्केपचा सदस्य प्राणिमित्र प्रणव कुलकर्णी यांनी महाड तालुक्यातील शिक्षकांच्या येथे प्रशिक्षण शिबिरात केले.
शिबिरामध्ये सातवीसाठी विज्ञान विषय शिकविणाºया शिक्षकांना परिसर परिचय करून देण्यासाठी सिस्केप संस्थेला निमंत्रित करण्यात आले होते. यावेळेस सिस्केपचे अध्यक्ष सागर मेस्त्री, प्रणव कुलकर्णी, योगेश गुरव, मीत डाखवे, समीर गोगावले यांनी मार्गदर्शन केले.
निसर्गाचा समतोल ढासळल्यामुळे प्राणी, वनस्पती, पक्ष्यांच्या प्रजाती संपुष्टात आल्या आहेत. विषारी, बिनविषारी आणि निमविषारी सापांबद्दल मार्गदर्शन केले. स्लाईड शोच्या माध्यमातून शंकांचे निरसन करण्यात आले. सर्पविष, त्यावर उपचार म्हणून तयार करण्यात येणारे प्रतिविष, गिधाडांची लुप्त होत असलेली प्रजाती, गिधाड संवर्धन प्रकल्प या विषयावर सागर मेस्त्री यांनी या वेळेस मार्गदर्शन केले. शिक्षक हा चांगला समाज घडविणारा असून त्यांच्याकडून निसर्ग घडविणारी नवी पिढी तयार होईल, असा विश्वासही सागर मेस्त्री यांनी व्यक्त केला.