एकाच मतदाराचे दोन मतदार यादीत नाव; खारघरमधील प्रकार

By वैभव गायकर | Published: May 12, 2024 06:45 PM2024-05-12T18:45:16+5:302024-05-12T18:45:35+5:30

वैभव गायकर/ पनवेल : खारघर मध्ये एका मतदाराचे नाव दोन वेगवेगळ्या यादीत समाविष्ट झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.यामुळे मतदारांमध्ये ...

Name of same voter in two electoral rolls; incident in Kharghar | एकाच मतदाराचे दोन मतदार यादीत नाव; खारघरमधील प्रकार

एकाच मतदाराचे दोन मतदार यादीत नाव; खारघरमधील प्रकार

वैभव गायकर/पनवेल: खारघर मध्ये एका मतदाराचे नाव दोन वेगवेगळ्या यादीत समाविष्ट झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.यामुळे मतदारांमध्ये संभ्रमात असुन बोगस मतदानाची शक्यता देखील निर्माण झाली आहे. एकाच एपिक (EPIC) नंबरचे दोन वेगवेगळे मतदार दिसून येत आहेत. असे पनवेल महानगरपालिकेमध्ये अनेक मतदारांचे झालेले आहे.

त्याबद्दल मतदारांमध्ये नाराजी आहे. अनेक नावे डिलीट झालेली आहेत. बऱ्याचशा मतदारांचे मतदान नोंदलेला असून ते याद्यांमध्ये सापडत नाही.खारघर मधील रणदिवे कुणाल धनंजय(25) हे खारघर सेक्टर 11 मधील बालाजी हौसिंग सोसायटीत वास्तव्यास आहेत.त्यांचे खारघर मधील बालभारती शाळेतील मतदान केंद्रावर नाव आहे.त्यांचा मतदान क्रमांक 681 आहे. तर दुसरा नाव थेट तळोजा नोड मधील पेठाळी गावातील जिल्हा परिषद शाळेतील यादीत आला आहे.याठिकाणी रणदिवे यांचा मतदार क्रमांक 913 आहे.

एकाच मतदाराला दोन क्रमांक कसे काय मिळू शकतात ? असा प्रश्न खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांनी उपस्थित केला आहे.पनवेल मध्ये शेकडो मतदारांच्या बाबतीत असा प्रकार झाला आहे असे गरड यांनी सांगितले.  प्रतिक्रिया - असे प्रकार घडले असतील तर आम्ही याबाबत गुन्हा दाखल करू.मतदारांनी आपले नाव दुसऱ्या पत्त्यावर दिल्याशिवाय असे प्रकार घडणार नाहीत. - राहुल मुंडके ( सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,पनवेल)

Web Title: Name of same voter in two electoral rolls; incident in Kharghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.