- गणेश चोडणेकरआगरदांडा : गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले व यशवंतनगर पंचक्रोशीतील शेकडो घरगुती दूरध्वनी जोडण्या व भ्रमणध्वनी असलेले भारत संचार निगमचे नांदगाव येथील कार्यालय लॉकडाऊन करण्यात आले आहे.दोन-चार वर्षांपूर्वी एक कुशल तंत्रज्ञ, दोन मदतनीस व एक उपअभियंता असे कर्मचारी ५०० ते ६०० घरगुती ग्राहकांना ते योग्य सेवा पुरवीत होते; परंतु कालांतराने बदली व निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त झालेल्या जागा भरल्याच नाहीत. उलट कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास कंपनीने भाग पाडले. त्यामुळे या कार्यालयासाठी कोणी कर्मचारीच उरला नाही.मुरुड शहरात असलेल्या तालुक्याच्या मुख्य केंद्रात केवळ एक उपअभियंताच आहे. त्यामुळे स्थानिक ग्राहकांना तक्रार करायची झाल्यास अलिबाग केंद्रात धाव घ्यावी लागते. कुशल तंत्रज्ञाअभावी येथील छोट्या-मोठ्या दुरुस्त्या अथवा बिघाडासाठी अलिबाग येथून येणाºया तंत्रज्ञावर अवलंबून राहावे लागते.निसर्ग चक्रीवादळात येथील दूरध्वनी, भ्रमणध्वनी व इंटरनेट सेवा पूर्णपणे कोलमडली असून, ही सर्व यंत्रणाच पूर्णपणे बंद पडली आहे. या कारणास्तव बहुतांशी घरगुती दूरध्वनी व शेकडो भ्रमणध्वनीधारकांनी ही सेवा बंद करून अन्य कंपन्यांची सेवा घेतली आहे. त्यामुळे भारत संचार निगमला आपला गाशाच गुंडाळावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सेवा बंद केलेल्या ग्राहकांची सुरुवातीला भरलेली अनामत रक्कम परत करण्याचे साधे सौजन्यही भारत संचार निगमने दाखविलेले नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सेवा पूर्ववत सुरू राहावी, म्हणून नांदगाव केंद्रासाठी निगमने एक मोठा किमती जनरेटरही येथे बसविला होता; परंतु तोदेखील आता धूळखात पडला आहे. तर केंद्राच्या दरवाजाला मोठे टाळे लावण्यात आले आहे. मुरुड केंद्राचे उपअभियंता कधीतरी येथे भेट देत असल्याचे सूत्रांकडून समजले.घरगुती दूरध्वनी केवळ रहिवासी दाखल्यासाठीयशवंतनगर पंचक्रोशीतील ग्राहकांनी भारत संचार निगमची ही सेवा व त्याचे देयक हे शासकीय कामी एक रहिवासी दाखला म्हणून उपयोगी पडत असल्याने सुरू ठेवले होते.परंतु सध्या सेवा पुन्हा कधी सुरू होईल हे सांगता येत नसल्याने व आता आधार कार्डची सक्ती असल्याने, सेवेचे देयक कुचकामी ठरल्याने ग्राहकांना ही सेवा बंद करण्यास संधी मिळाली आहे.भारत संचार निगमची ही लॅण्डलाइन सेवा सतत बंद स्थितीतच राहात असल्याने व त्याचे देयक मात्र दर महिन्याला बरोबर येत असल्याने ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एप्रिल महिन्यात मुरुड केंद्राकडे अर्ज केला असता, अलिबागच्या कार्यालयात जाण्याचे सांगण्यात आले आहे.- भानुदास राऊत, ग्राहक, नांदगाव
नांदगावचे भारत संचार निगमचे कार्यालय लॉकडाऊन?, मुरुडमध्ये एकच उपअभियंता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 1:07 AM