नंदीग्राम एक्सप्रेसच्या कॉम्प्रेसरला आग; प्रवासी भयभीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 10:06 PM2024-11-09T22:06:43+5:302024-11-09T22:06:43+5:30
आज संंध्याकाळी 7 च्या सुमारास नंदीग्राम एक्सप्रेस कसारा रेल्वे स्थानकापासून 700 मीटर दूरवर एका सिग्नलला उभी असता अचानक एक्सप्रेसच्या एका आरक्षित बोगी खालून धुर यायला लागला.
शाम धुमाळ
कसारा : मुंबईहून नांदेड जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या बोगी खालील कॉम्प्रेसरला अचानक आग लागल्याने गाडीतील प्रवासी भयभीत झाले होते. सिग्नलवर थांबलेल्या गाडीतील प्रवाशांनी गाडीतून खाली उतरून इतर डब्यात पळ काढला.
आज संंध्याकाळी 7 च्या सुमारास नदीग्राम एक्सप्रेस कसारा रेल्वे स्थानकापासून 700 मीटर दूर वर एका सिग्नलला उभी असता अचानक एक्सप्रेसच्या एका आरक्षित बोगी खालून धुर यायला लागला. 5 मिनिटांनी त्या कॉम्प्रेसरने पेट घेतला. या दरम्यान हवा सुटल्याने कॉम्प्रेसर व केबल जळत होत्या. त्यामुळे आगीचा भडका उडाला होता.
आगीची घटना समजता आपत्ती व्यवस्थापन टीमचे शुभम धोंगडे व सहकारी तसेच रेल्वे पोलीस ,स्टेशन मॅनेजर,कर्मचारी यांनी धाव घेत गाडीतील फायर सिलेंडरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. गाडी तब्ब्ल 25 मिनिटांनी प्लॅटफॉर्मवर घेतली. गाडीतील सर्व प्रवाशांना सुखरूप स्थानकावर आणल्यानंतर आग लागलेल्या बोगी खालील कॉम्प्रेसर विझविण्यात आला. पेट घेतलेल्या केबल काढून पुढील कार्यवाहीसाठी गाडी इगतपुरीला रवाना केली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी प्रवासी पूर्ण भयभीत झाले होते.
याप्रकरणी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे, कसारा शहर पोलीस स्टेचे प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव यांनी घटनास्थला वरील माहिती घेऊन मदत करून आपत्ती निवारण करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.