ठप्प पोषण आहार नव्याने सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:17 AM2018-03-29T01:17:03+5:302018-03-29T01:17:03+5:30
येत्या ५ एप्रिलपासून रायगड जिल्ह्यात नव्याने पोषण आहार वाटप सुरू होणार
अमोल पाटील
खालापूर : येत्या ५ एप्रिलपासून रायगड जिल्ह्यात नव्याने पोषण आहार वाटप सुरू होणार असल्याची घोषणा जिल्हा महिला व कल्याण सभापतींनी बुधवारी केली. त्यामुळे आता जुना पोषण आहार बंद होऊन लाभार्थ्यांना नवा चविष्ट पोषण आहार मिळणार आहे.
रायगड जिल्ह्यातील कुपोषित बालक, गरोदर माता, स्तनदा माता, जिरो ते सहा वयोगटातील लहान बालकांसाठी एकात्मिक बाल कल्याण विभागाकडून पुरवण्यात येणारा टेक होम रेशन अर्थात टी एच आर, म्हणजेच पोषण आहार या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले होते. या प्रकरणी खालापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. एका शासकीय अधिकाऱ्यासह बचतगटाच्या महिलांना अटक झाली. यातील सूत्रधार महेंद्र गायकवाड हा अद्याप फरार आहे.
घोटाळ््यामुळे खालापूर ृतालुक्यात जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत कुपोषित बालकांसाठी तर गरोदर मातांसाठीचे आहार वाटप बंद होते. ‘लोकमत’ने या बाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेने घेतली.
दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती उमा मुंडे यांनी पोषण आहार पुरवठ्यासाठी जिल्हाधिकाºयांसमवेत बुधवारी बैठक घेतली. त्या वेळी गृह लक्ष्मी उद्योग या पुरवठादाराला खालापूर तालुक्यातील पोषण आहार पुरवण्याचे कंत्राट दिल्याची घोषणा केली. या आहारात लाभार्थ्यांना शिरा, शेवया, उपमा, खिचडीसह लहान बालकांना बाल आहार पुरवण्यात येणार आहे. नुकतीच अंगणवाडी सेविकांसोबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. आगामी काळात पोषण आहार पुरवठा, वजन आणि त्याच्या नोंदी याबाबत विशेष दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. सभापती नरेश पाटील, उपसभापती विश्वनाथ पाटील, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी पठाण, गटविकास अधिकारी संजय भोईर, सहायक एकात्मिक विकास अधिकारी खालापूर यांच्यासह तालुक्यातील सर्वच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.