Narayan Rane: नारायण राणे आज पोलीस ठाण्यात हजेरी लावणार नाहीत?, थेट दिल्लीला रवाना होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 10:37 AM2021-08-30T10:37:53+5:302021-08-30T10:38:20+5:30

Narayan Rane: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड पोलिसांनी अटक केली होती.

Narayan Rane will not report to the police station today likely to go directly to Delhi | Narayan Rane: नारायण राणे आज पोलीस ठाण्यात हजेरी लावणार नाहीत?, थेट दिल्लीला रवाना होण्याची शक्यता

Narayan Rane: नारायण राणे आज पोलीस ठाण्यात हजेरी लावणार नाहीत?, थेट दिल्लीला रवाना होण्याची शक्यता

googlenewsNext

Narayan Rane: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर महाड कोर्टाकडून राणेंना जामीन मंजूर झाला होता. राणेंना ३० ऑगस्ट रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राणे आज अलिबाग पोलीस ठाण्यात हजेरी लावणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व मंत्र्यांना दिल्लीत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राणे आज पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. 

दरम्यान, राणेंच्या हजेरीची शक्यता असल्यामुळे अलिबागमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राणेंना कोर्टाने महिन्यातून दोन वेळा पोलीस ठाण्यात हजर होण्याचा आदेश कोर्टानं दिला आहे. त्याचसोबत यापुढे अशी आक्षेपार्ह विधानं होणार नाहीत याची काळजी घेण्याच्याही सूचना राणेंना देण्यात आल्या आहेत. यावर राणेंकडूनही कोर्टासमोर अशी विधानं यापुढे केली जाणार नाहीत अशी ग्वाही देण्यात आली आहे. 

Web Title: Narayan Rane will not report to the police station today likely to go directly to Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.