अलिबाग : युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली आयोजित राष्ट्रीय गोवासायकलिंग मोहिमेचा शुभारंभ रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्र वारी सकाळी वरसोली येथील कवळे कॉटेजमधून स्वत: सायकलिंग करून केला. युथ हॉस्टेल चळवळ ही देशातील युवकांना जोडणारी चळवळ आहे. अलिबागमध्ये युथ हॉस्टेलच्या उभारणीकरिता जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती जागा उपलब्ध करून दिली जाईल, असा विश्वास डॉ. सूर्यवंशी यांनी बोलताना व्यक्त केला.
रायगड जिल्ह्यास असलेल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार करून रायगड जिल्हा पयर्टनदृष्ट्या विकसित करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी अखेरीस सांगितले. जम्मू-काश्मीर, मेघालय, अरु णाचलप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, झारखंड यासह अन्य एकूण १२ राज्यांतील ४० सायकलिस्ट या मोहिमेत सहभागी झाले आहेत. या मध्ये चार महिला सायकलिस्टचाही समावेश आहे.
कोकणच्या सागरीकिनारपट्टीतून गोव्याला जाणाऱ्या या नऊ दिवसांच्या या मोहिमेचे नेतृत्व गुजरात राज्यातील पहिली महिला विक्र मवीर कन्या वृषाली पुरोहित ही करीत आहे, तर कार्यक्र म अधिकारी एस. शैलेश हे आहेत. या वेळी युथ हॉस्टेल राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण समितीचे सदस्य तथा अलिबाग युथ हॉस्टेलचे कार्याध्यक्ष जयंत धुळप, महाराष्ट्र राज्य युथ हॉस्टेलचे प्रभारी अध्यक्ष गिर्यारोहक रमेश किणी, अलिबाग युथ हॉस्टेलचे सचिव सचिन क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. गुरुवारी संध्याकाळी अलिबाग युथ हॉस्टेल अलिबागचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी सर्व सायकलिस्टचे अलिबाग येथे स्वागत के ली. त्यांनी मोहिमेच्या मार्गावरील ऐतिहासिक किल्ले आणि इतिहास याबाबत संवाद साधला.