निसर्ग चक्रीवादळ बाधित मच्छीमार दुर्लक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 12:52 AM2020-06-24T00:52:40+5:302020-06-24T00:54:52+5:30
या नुकसानीचे शासनामार्फत पंचनामे केले गेले. मात्र, हे पंचनामे करताना मच्छीमारांचे नुकसान डावलले गेल्याचे मत आमदार रमेश पाटील यांनी व्यक्त केले.
आगरदांडा : मुरुड किनाऱ्यावर प्रघात केलेल्या निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले आहे. या नुकसानीचे शासनामार्फत पंचनामे केले गेले. मात्र, हे पंचनामे करताना मच्छीमारांचे नुकसान डावलले गेल्याचे मत आमदार रमेश पाटील यांनी व्यक्त केले.
वादळी लाटांनी मासेमारी नौकांमध्ये पाणी भरल्याने इंजिनाचे झालेले नुकसान, होड्या एकमेकांवर अथवा किनाºयावर आदळून मोठे नुकसान झाले आहे. वादळापूर्वी समुद्रात टाकलेली जाळी पुन्हा परत आणू न शकल्याने, जाळी वाहून गेल्याचे पंचनामे अथवा किनाºयावर शाकारून ठेवलेल्या नौकांवरील बंदिस्ती उडून गेली, घरातीचे छत आणि कौले उडाल्याने पावसाळ्यासाठी साठवून ठेवलेल्या सुक्या मासळीच्या झालेल्या नुकसानीचे पाहणी कोळी महासंघाचे अध्यक्ष तथा आमदार रमेश पाटील यांनी केली. यावेळी कोळी समाजाने आपल्या व्यथा मांडल्या. कोळी बांधवांचे या वादळामुळे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर संकट ओढावले आहे. यामध्ये १३ बोटींचे २ लाख ५० हजार रुपयांचे तर लिलाव शेडचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, कोळी समाज उद्ध्वस्त झाला आहे, अशी व्यथा सागरकन्या मच्छीमारी सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले यांनी कोळी महासंघाचे अध्यक्ष तथा आमदार रमेश पाटील यांच्यासमोर मांडली. निसर्ग प्रकोप होऊनही १८ दिवसांनंतर झाले, तरी जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असून, कोणत्याच गावाला वीजपुरवठा होत नाही असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कोळी बांधवांना भरपाई वाढवून न दिल्यास येणाºया अधिवेशनात आवाज उठवून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून जास्तीतजास्त भरपाई कशी मिळेल, याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आ. पाटील यांनी दिले. यावेळी मुरुड मच्छीमारी सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर मकू आदी उपस्थित होते.
>‘वादळग्रस्तांना घरकुल मिळवून देणार’
तळा : मांदाड येथील पाण्याचा प्रश्न, चक्रीवादळात शाळेतील झालेले कॉम्पुटर आणि प्रींटरचे नुकसान मी माझ्या आमदारकीच्या फंडातून करुन देणार असल्याचे आश्वासन आ.रमेश पाटील यांनी तळा येथे पाहणी दरम्यान दिले. पूर्णत: नुकसान झालेल्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळवुन देण्याचे आश्वासन दिले, त्याचप्रमाणे प्रत्येक मच्छीमार बांधवांनी बँकेत किसान क्रेडिट कार्ड काढुन व्यवसाय करावा, समुद्रा शेजारी मच्छशेती करुन त्यातून कर्ज फेडुन समृद्ध व्हावे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले. या पाहणी दौºयाच्या आधी चक्रीवादळात नुकसान झालेल्या तळा प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी आ.रमेश पाटील यांनी केली. संपुर्ण प्राथमिक केंद्र, डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या वसाहतीचे मोठे नुकसान झाले असून आज अठरा दिवस होऊन गेले तरी जिल्हा आरोग्य विभागाकडून तातडीची मदत न मिळाल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. पावसाळ्याच्या दिवसात गळत्या रुममध्ये डॉक्टर रुग्णांना कशी सेवा पुरवणार असा प्रश्न उपस्थित करुन जिल्हा आरोग्य विभागाला जाब विचारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
>वाढीव भरपाईसाठी प्रयत्नशील : मासळीचा दुष्काळ अथवा चक्रीवादळमध्ये झालेले मच्छीमारांचे नुकसान असो, यामध्ये नेहमी शासन कोळी समाजावर अन्याय करीत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी यावेळी केला. मच्छीमारांना भरपाई वाढवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितल.