कर्नाळ्यातील निसर्ग पर्यटनाला पर्यटकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:22 PM2023-08-28T12:22:52+5:302023-08-28T12:23:45+5:30

अभयारण्य प्रशासनासह याठिकाणच्या बचत गटांनादेखील रोजगार प्राप्त झाले आहे.

Nature tourism in Karnala is preferred by tourists | कर्नाळ्यातील निसर्ग पर्यटनाला पर्यटकांची पसंती

कर्नाळ्यातील निसर्ग पर्यटनाला पर्यटकांची पसंती

googlenewsNext

पनवेल : २०२२ मध्ये ऑगस्ट महिन्यात  पनवेल येथील ऐतिहासिक कर्नाळा किल्ला जोरदार पावसामुळे ढासळू लागला असल्याने अभयारण्य प्रशासनाने पर्यटकांसाठी प्रवेश बंदीचा निर्णय घेतला होता. यावर्षी १ जून रोजी हा किल्ला सुरू केल्याने पर्यटकांनी त्याठिकाणच्या निसर्ग पर्यटनाला पसंती देत मोठ्या संख्येने या ठिकाणाला भेट दिल्याने अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत अभयारण्य प्रशासनाच्या तिजोरीत २५ लाखांची भर पडली आहे. 

अभयारण्य प्रशासनासह याठिकाणच्या बचत गटांनादेखील रोजगार प्राप्त झाले आहे. कर्नाळा अभयारण्यातील नैसर्गिक अधिवासासह येथील ट्रेकिंगची संधी ट्रेकर्सना उपलब्ध होत असल्याने मुंबई उपनगर, पुणे, नवी मुंबई, कल्याण, ठाणे येथील ट्रेकर्स याठिकाणी धूम ठोकत आहेत. 

किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व 
अभयारण्य प्रशासनाच्या उत्पनासह स्थानिक बचत गटांवर पडला होता. कर्नाळा किल्ल्याचा उल्लेख यादवकाळातही आढळतो. 
सन १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. पुढे पुरंदरच्या तहामध्ये तो मोगलांच्या ताब्यात गेला. 
१६७० मध्ये मराठ्यांनी पुन्हा कर्नाळा किल्ला आपल्या साम्राज्यात आणला. स्वातंत्र्यसैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव फडके या किल्ल्याचे किल्लेदार होते. 

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक उपाययोजना
 विशेष म्हणजे पनवेलसारख्या भागाचा झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता सिमेंटच्या जंगलातून काही क्षणाची फुरसत म्हणूनदेखील शहरी नागरिक या ठिकाणाला भेट देत आहेत. 
 पनवेलमधील बहुतांशी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी आहे. त्यामुळेदेखील पर्यटक आवर्जून कर्नाळा अभयारण्याला भेट देत आहेत.
 यापूर्वी दुरवस्था झालेल्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ वन विभागाने खबरदारी घेत प्रवेशद्वारावर नव्याने रेलिंग बसवली आहे. 
 त्यामुळे सध्यातरी पर्यटकांच्या सुरक्षेला धोका नसल्याने पुन्हा एकदा ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्याची सफर पर्यटक, ट्रेकर्स यांना करता येणार आहे. 

पूर्वी बोरघाटमार्गे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. नंतर हा किल्ला काही काळ मोगलांच्या ताब्यात होता. १६७० मध्ये मराठ्यांनी पुन्हा कर्नाळा किल्ला आपल्या साम्राज्यात आणला. 

कर्नाळा किल्ला सुरू झाल्याने अवघ्या तीन महिन्यांत अभयारण्य प्रशासनाच्या महसुलात २५ लाखांची भर पडली आहे. येथील ट्रेकिंगच्या दृष्टीने इतर पर्यटनाची कामेदेखील लवकरच मार्गी लागतील. 
- नारायण राठोड, वन परिक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य

Web Title: Nature tourism in Karnala is preferred by tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड