शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

कर्नाळ्यातील निसर्ग पर्यटनाला पर्यटकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:22 PM

अभयारण्य प्रशासनासह याठिकाणच्या बचत गटांनादेखील रोजगार प्राप्त झाले आहे.

पनवेल : २०२२ मध्ये ऑगस्ट महिन्यात  पनवेल येथील ऐतिहासिक कर्नाळा किल्ला जोरदार पावसामुळे ढासळू लागला असल्याने अभयारण्य प्रशासनाने पर्यटकांसाठी प्रवेश बंदीचा निर्णय घेतला होता. यावर्षी १ जून रोजी हा किल्ला सुरू केल्याने पर्यटकांनी त्याठिकाणच्या निसर्ग पर्यटनाला पसंती देत मोठ्या संख्येने या ठिकाणाला भेट दिल्याने अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत अभयारण्य प्रशासनाच्या तिजोरीत २५ लाखांची भर पडली आहे. 

अभयारण्य प्रशासनासह याठिकाणच्या बचत गटांनादेखील रोजगार प्राप्त झाले आहे. कर्नाळा अभयारण्यातील नैसर्गिक अधिवासासह येथील ट्रेकिंगची संधी ट्रेकर्सना उपलब्ध होत असल्याने मुंबई उपनगर, पुणे, नवी मुंबई, कल्याण, ठाणे येथील ट्रेकर्स याठिकाणी धूम ठोकत आहेत. 

किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व अभयारण्य प्रशासनाच्या उत्पनासह स्थानिक बचत गटांवर पडला होता. कर्नाळा किल्ल्याचा उल्लेख यादवकाळातही आढळतो. सन १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. पुढे पुरंदरच्या तहामध्ये तो मोगलांच्या ताब्यात गेला. १६७० मध्ये मराठ्यांनी पुन्हा कर्नाळा किल्ला आपल्या साम्राज्यात आणला. स्वातंत्र्यसैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव फडके या किल्ल्याचे किल्लेदार होते. 

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक उपाययोजना विशेष म्हणजे पनवेलसारख्या भागाचा झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता सिमेंटच्या जंगलातून काही क्षणाची फुरसत म्हणूनदेखील शहरी नागरिक या ठिकाणाला भेट देत आहेत.  पनवेलमधील बहुतांशी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी आहे. त्यामुळेदेखील पर्यटक आवर्जून कर्नाळा अभयारण्याला भेट देत आहेत. यापूर्वी दुरवस्था झालेल्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ वन विभागाने खबरदारी घेत प्रवेशद्वारावर नव्याने रेलिंग बसवली आहे.  त्यामुळे सध्यातरी पर्यटकांच्या सुरक्षेला धोका नसल्याने पुन्हा एकदा ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्याची सफर पर्यटक, ट्रेकर्स यांना करता येणार आहे. 

पूर्वी बोरघाटमार्गे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. नंतर हा किल्ला काही काळ मोगलांच्या ताब्यात होता. १६७० मध्ये मराठ्यांनी पुन्हा कर्नाळा किल्ला आपल्या साम्राज्यात आणला. 

कर्नाळा किल्ला सुरू झाल्याने अवघ्या तीन महिन्यांत अभयारण्य प्रशासनाच्या महसुलात २५ लाखांची भर पडली आहे. येथील ट्रेकिंगच्या दृष्टीने इतर पर्यटनाची कामेदेखील लवकरच मार्गी लागतील. - नारायण राठोड, वन परिक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य

टॅग्स :Raigadरायगड