म्हसळा तालुक्यातील नवाबकालीन मराठी शाळा होणार जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:40 PM2020-02-14T23:40:58+5:302020-02-14T23:42:19+5:30

नागरिक संतप्त : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर

Navabal Marathi School will be landowner in Mhasha taluka | म्हसळा तालुक्यातील नवाबकालीन मराठी शाळा होणार जमीनदोस्त

म्हसळा तालुक्यातील नवाबकालीन मराठी शाळा होणार जमीनदोस्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसळा : राज्य सरकारने सर्व शाळांमध्ये मराठी सक्ती केली असली, तरी म्हसळा शहरातील १४५ वर्षे जुन्या नवाबकालीन मराठी शाळेला नगरपंचायतीचे ग्रहण लागल्याने आता अनेकांच्या आठवणातील ‘ती’ शाळा आता जमीनदोस्त होणार आहे. शाळा तोडून नगरपंचायत इमारत बनवण्यासाठीचा ठराव रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.


म्हसळा शहरातील नगरसेवकांसाठी सद्यस्थितीत असणारे नगरपंचायत कार्यालय अपुरे पडत असल्याने या नगरसेवकांना स्वत:च्या बसण्याकरिता देशासाठी उद्याचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्याचा डाव यशस्वी झाला आहे. यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक १२ (१६) मध्ये नऊ गुंठ्यात असणारी राजिप शाळा न.१ गावठाण क्रं.१/१८७ या शहरातील मध्यवर्ती नवाबकालीन शाळा पाडून नगरपंचायत इमारत बांधण्यासाठी ना हरकत दाखला देण्यासाठीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात मराठी भाषा टिकावी म्हणून सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यात आली असली, तरी मराठी भाषा हद्दपार व्हावी म्हणून रायगड जिल्हा परिषद प्रयत्न करीत असल्याचा आरोप तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यातील म्हसळा शहरातून चक्क १४५ वर्षे जुनी सद्यस्थित १५९ पट असणारी नवाबकालीन मराठी शाळा काही राजकीय लोकप्रतिनिधी आपल्या फायद्यासाठी हद्दपार करत असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष सुनील अंजार्लेकर यांनी केला आहे.


म्हसळा शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक १ मध्ये तालुक्यातील इतर मराठी शाळा बंद झाल्यामुळे त्या गावातील विद्यार्थीही शिक्षण घेण्यासाठी येतात. आमची मराठी भाषा टिकावी, आमची मराठी शाळा वाचावी, यासाठी आम्ही ही शाळा तोडू देणार नाही. शाळा वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
- सुनील अंजार्लेकर,
अध्यक्ष, कुंभार समाज तथा
उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन कमिटी

Web Title: Navabal Marathi School will be landowner in Mhasha taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा