नवघर गाव ते मर्क्स कंपनी रस्त्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:10 PM2020-02-26T23:10:59+5:302020-02-26T23:11:01+5:30
कारवाईची मागणी; सिडको कार्यालयावर फेर मोर्चा काढण्याचा इशारा
उरण : ग्रामस्थांच्या मोर्चानंतर सिडकोने नवघर गाव ते मर्क्स कंपनी दरम्यानच्या सुरू करण्यात आलेल्या रस्ता दुरुस्तीचे काम ठेके दाराकडूून अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. त्यामुळे अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याला पाठीशी घालणाऱ्या सिडकोच्या अधिकाऱ्यांवर सात दिवसांत कारवाई करण्यात यावी, अन्यथा सिडको कार्यालयावर फेर मोर्चा काढण्याचा इशारा पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच भार्गव पाटील यांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे.
सिडकोच्या अखत्यारित असलेल्या नवघर गाव ते मर्क्स कंपनी दरम्यानच्या रस्त्याची पार चाळण झाली आहे. दुरुस्तीअभावी रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे अपघाताच्या प्रमाणातही भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे धोकादायक ठरत चाललेल्या या रस्त्यावरून कामगार, वाहनचालक यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. नवघर गाव ते मर्क्स कंपनी दरम्यानचा नादुरुस्त झालेला रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी पागोटे ग्रामपंचायतीनेसिडकोकडे सातत्याने केली होती. मात्र, ग्रामपंचायतीच्या मागणीला सिडकोच्या अधिकाºयांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे नवघर गाव ते मर्क्स कंपनी दरम्यानचा नादुरुस्त झालेला रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच भार्गव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संतप्त ग्रामस्थांनी उरण येथील सिडकोच्या कार्यालयावर २० फेब्रुवारी रोजी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता.
ग्रामस्थांच्या मोर्चानंतर सिडकोने नवघर गाव ते मर्क्स कंपनी दरम्यानचा रस्ता १५ दिवसांत दुरुस्त करून देण्याचे आश्वासन सिडकोचे कार्यकारी अभियंता बी. बी. साळवे यांनी दिले होते. त्या आश्वासनानुसार रस्ता दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले आहे. मात्र, ठेके दाराकडूूून रस्ता दुरुस्तीचे करण्यात येत असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे.
जनतेचा पैसा निकृष्ट दर्जाचे काम करून वाया घालविणाºया अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून आणि त्याला पाठीशी घालणाºया सिडकोच्या अधिकाºयांवर सात दिवसांत कारवाई करण्यात यावी, अन्यथा सिडको कार्यालयावर फेर मोर्चा काढण्याचा इशारा पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच भार्गव पाटील यांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे.