- जयंत धुळप।अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूककोंडी टाळून, वाहतूक सुरळीत ठेवून चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ द्यायचा नाही, असा चंग रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी बांधून, गेल्या १५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच विनावाहतूककोंडी प्रवास वास्तवात उतरवून दाखविला आहे.गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाºया चाकरमानी गणेशभक्तांच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास म्हणजे राज्याच्या गृहविभागासमोरील एक मोठे आव्हानच असते. दुरवस्थेतील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, त्यावरील खड्डे आणि त्यामुळे तासन्तास होणारी वाहतूककोंडी, त्यातून उफाळून येणारा जनप्रक्षोभ यापैकी यंदा काहीही अनुभवास आले नाही. मुंबई-गोवा महामार्ग दुरवस्थेत असतानाही पळस्पे (पनवेल) ते कशेडी (पोलादपूर) या ८२ कि.मी. अंतराच्या रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूककोंडी टाळून वाहतूक सुरळीत ठेवून चाकरमान्यांना रायगड वाहतूक पोलिसांच्या २४ तासांच्या अथक परिश्रमातून कोणत्याही प्रकारे त्रास झाला नाही. बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून गुरु वारी दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल तीन लाख विविध प्रकारची वाहने कोकणात सुखरूप रवाना झाल्याची नोंद वडखळ आणि कशेडी येथील रायगड वाहतूक पोलीस केंद्रावर झाली असल्याची माहिती रायगड वाहतूक पोलीस विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांनी दिली.पोलिसांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदनरायगड पोलिसांच्या या २४ तास अथक सेवाकार्यास अनेक सहकार्याचे हात लाभत आहेत. ‘लोकमत’ आणि रायगड वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियंत्रण व सुरक्षा विषयक बॅनर्स सर्वत्र यापूर्वीच लावण्यात आले आहेत. वाहतूक नियंत्रणाकरिता आवश्यक १०० रेड बॅरिकेट्स डोलवी-धरमतर येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने रायगड पोलिसांना वडखळ येथे सुपूर्द करण्यात आले. तर वाहतूक विनाकोंडी अखंड सुरू ठेवण्यात यशस्वी होत असलेल्या वाहतूक पोलीस आणि कर्मचाºयांना जेएसडब्ल्यूचे वरिष्ठ अधिकारी विनय नेने, अरु ण शिर्के, कुमार थत्ते यांनी वडखळ येथे गुरु वारी सकाळी गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करून त्यांचा उत्साह द्विगुणित केला.बेदरकार ओव्हरटेकिंगला पूर्णपणे बंदीकोणत्याही परिस्थितीत बेदरकार ओव्हरटेकिंग होणार नाही, या एक मुद्द्याला प्राधान्य दिल्याने वाहतूककोंडी टाळणे शक्य झाले आहे. त्यामुळे विनाखंड वाहतूक सुरू ठेवण्यात यश येत असल्याचे वाहतूक शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील दारूची दुकाने बंद आणि बार बंद या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गेल्या पाच दिवसांत एकही मद्यपीचालक वा मद्यपी प्रवासी यांच्यावर कारवाई करण्याची वेळ पोलिसांना आली नाही. हा यंदाच्या वाहतुकीतील एक अत्यंत महत्त्वाचा लक्षवेधी मुद्दा ठरला असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.चोख पोलीस बंदोबस्तमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पळस्पे (पनवेल) ते कशेडी (पोलादपूर) या रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाच्या टप्प्यात, एक स्वतंत्र पोलीस अधीक्षक, एक अप्पर पोलीस अधीक्षक, ६ पोलीस उप विभागीय पोलीस अधिकारी, १३ पोलीस निरीक्षक, ४७ उपनिरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक आणि ३१० वाहतूक नियंत्रक पोलीस, १० क्रेन्स, १० अॅम्ब्युलन्स, १० पोलीस वायरलेस जिप, संभाव्य वाहतूककोंडीच्या पारंपरिक ४८ ठिकाणी सीसीटीव्ही २४ तास वॉच, ५२ माहिती फलक, तर १५० दिशादर्शक फलक, अशा वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतून यंदा महामागार्वरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात यश आले.बसची कारला धडकगोवा राष्ट्रीय महामागार्गावर महाड तालुक्यातील इसाने-कांबळे गावाच्या हद्दीत गुरु वारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास कोकणात जाणाºया प्रवासी खासगी बसने समोरून येणाºया कारला धडक दिल्याने कारमधील दोघे प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी बोलताना दिली आहे. अपघातग्रस्त दोन्ही वाहने तत्काळ बाजूला काढून गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रि या सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.चालकांसाठी नवी मुंबई पोलिसांची हेल्पलाइननवी मुंबईमधून प्रवास करणाºया चालकांसाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने ७७३८३९३८३९ हा टोल फ्री क्र मांक सुरू करण्यात आलेला आहे. वाहतुकीसंदर्भात येणाºया अडचणी, शंका यासंदर्भात या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आलेले आहे.२४ तास चार मदत केंद्रेचालकांना मार्गातील बदल, सूचना तसेच येणाºया अडचणी सोडवण्यासाठी कळंबोली ते खारपाडा दरम्यान चार मदत केंद्रे २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. कळंबोली, पळस्पे, कर्नाळा खिंड, तसेच खारपाडा (तारा) या ठिकाणी ही चार मदत केंद्रे सुरू आहेत.अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी क्रेन व रुग्णवाहिकांची व्यवस्थामहामार्गावर वाहनांची वर्दळ पाहता आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या मार्गावर १७ क्रे न व १० रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. अपघातप्रवण क्षेत्रात क्रे न व रुग्णवाहिका ठेवण्यात आलेल्या आहेत.अवजड वाहनांना प्रवेश बंदपनवेल ते सावंतवाडी या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ६६ वर पनवेल, सिंधुदुर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठणे, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ आदी ठिकाणी होणारी वाळू, रेती तसेच भरलेले ट्रक दि. २३ ते दि. २५ आॅगस्टपर्यंत रात्री ८ वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. तसेच १६ टन व त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहनांवर दि. ३१ आॅगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.पोलिसांचे आवाहनकोकणात जाणाºया गणेशभक्तांनी जास्तीत जास्त मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करावा व टोल फ्री पासेस वाहतूक शाखेच्या कार्यालयातून घेऊन जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांच्या मार्फत करण्यात आलेले आहे.राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. चालकांच्या मदतीसाठी या मार्गावर चार मदत केंद्रे उभारली आहेत. त्यामध्ये एक एक अधिकारी तैनात केला आहे. आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सक्षम यंत्रणा मार्गावर उभारली असून चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रवास करावा. आवश्यकता भासल्यास वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.- नितीन पवार,पोलीस उपायुक्त,परिमंडळ २
राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विनाकोंडी, तीन लाख वाहने कोकणाकडे रवाना, रायगड वाहतूक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 4:23 AM