नवरदेवाने दिली पुस्तकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:14 AM2018-05-03T04:14:53+5:302018-05-03T04:14:53+5:30

सध्या सर्वत्र हळदी -लग्नसमारंभ सुरू आहेत. यानिमित्त नातेवाइकांना कपडे वाटण्याची परंपरा कापसे मुठली येथील तरु ण हरेश कापसे यांनी मोडीत काढली.

Navaratri gift book | नवरदेवाने दिली पुस्तकांची भेट

नवरदेवाने दिली पुस्तकांची भेट

googlenewsNext

रोहा : सध्या सर्वत्र हळदी -लग्नसमारंभ सुरू आहेत. यानिमित्त नातेवाइकांना कपडे वाटण्याची परंपरा कापसे मुठली येथील तरु ण हरेश कापसे यांनी मोडीत काढली. त्याने हळदीला येणाऱ्या नातेवाईक व पाहुण्यांना पुस्तक भेट देऊन अनोखी संकल्पना जोपासली. त्याच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ग्रामीण भागासह शहरी भागात हळदी-लग्नसमारंभ सोहळ्याची धूम मोठी असते. यासाठी लाखोंचा खर्चही केला जातो. रोहे तालुक्यातील कापसे मुठवली येथे ३० एप्रिल रोजी हरेश कापसे यांचा विवाह पार पडला. या वेळी आलेल्या नातेवाईक व पाहुण्यांना नवरदेव व त्याचे मोठे बंधू अजयने पुस्तके भेट देण्याचा निर्णय घेतला. यात डॉ. बाबा आमटे, शिवचरित्र, तसेच विविध सामाजिक, धार्मिक, वैचारिक पुस्तकांचा समावेश होता. दोन्ही बंधूंचे कार्य समाजात प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया या वेळी उपस्थितांनी नोंदवली.

Web Title: Navaratri gift book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.