प्रदूषित शहरांत नवी मुंबई दुसऱ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:19 PM2019-01-13T23:19:07+5:302019-01-13T23:19:29+5:30

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल : वायुप्रदूषणात वाढ, उपाययोजनांचा अभाव

Navi Mumbai second place in polluted cities | प्रदूषित शहरांत नवी मुंबई दुसऱ्या स्थानी

प्रदूषित शहरांत नवी मुंबई दुसऱ्या स्थानी

Next

- कमलाकर कांबळे 


नवी मुंबई : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अलीकडेच जाहीर केलेल्या प्रदूषित शहरात माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नावारूपाला येत असलेल्या नवी मुंबईने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. गेल्या वर्षी प्रदूषित शहराच्या यादीत नवी मुंबई तिसºया स्थानावर होती. यावरून शहरातील वायुप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले असून, या संदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे, तसेच प्रदूषण रोखण्यासाठी यापूर्वी दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.


हवेतील वाढते प्रदूषण हा जागतिक स्तरावर चिंतेचा विषय बनला आहे. पर्यावरणाचा ºहास, शहरीकरणामुळे वाहनांची वाढती संख्या, विविध टप्प्यावर सुरू असलेली विकासकामे आदीमुळे हवेत धुळीचे कण पसरून वायुप्रदूषण होत असल्याचा जागतिक निष्कर्ष आहे. नवी मुंबई हे सुनियोजित शहर म्हणून नावारूपाला येत आहे. शहरात विविध प्रकल्प होऊ घातले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, जेएनपीटी बंदराचा विस्तार आदीमुळे शहरात वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. नवी मुंबईलगत दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत, तर सायन-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूर हे दोन मार्ग शहराला विभागून जातात. या मार्गावरून लाखो वाहने जा-ये करतात.


तसेच तुर्भे येथील एपीएमसीच्या बाजारपेठेत दररोज हजारो ट्रक व टेम्पो येतात. या सर्वाचा परिणाम म्हणून वायुप्रदूषणात वाढ होत असल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. वाढत्या वायुप्रदूषणामुळे शहरवासीयांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. खोकला, सर्दी, ताप तसेच श्वसनाचे त्रास होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे.


केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११ ते २०१५ या काळात केलेल्या सर्वेक्षणात नवी मुंबई शहर राज्यातील तिसºया क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून जाहीर केले होते. नवी मुंबईतील हवेत पार्टिक्युलेट मॅटर १० चे वार्षिक सरासरी प्रमाण ६० तर नायट्रोजन डायआॅक्साइड व कार्बनडाय आॅक्साइडचे सरासरी प्रमाण ४० पेक्षा अधिक असल्याचे आढळून आल्याने हे शहर प्रदूषित शहर म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वायुप्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्रालयाने दिल्या होत्या; परंतु स्थानिक प्रशासनाकडून या सूचनांना केराची टोपली दाखविल्याने प्रदूषणाचा आलेख उंचावल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून नवी मुंबई आता राज्यात दुसºया क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून पुढे आली आहे.

प्रदूषणकारी कारखान्यांना अभय : आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत नवी मुंबईत आहे. औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने आहेत. या कारखान्यांमुळे शहराच्या प्रदूषणात भर पडत आहे. अनेक कारखान्यातून रात्रीच्या वेळी हवेत विषारी धूर सोडला जातो. जवळच्या नागरी वस्तींना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. या संदर्भात रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, थातूरमातूर उत्तर देऊन त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जात असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. एकूणच एमआयडीसीतील प्रदूषणकारी कारखान्यांना ‘अर्थ’पूर्ण अभय देण्याचे धोरणही शहराच्या स्वास्थ्यासाठी मारक ठरत असल्याचे दिसून आले आहे.


उपाययोजना कागदावरच : महापालिका व प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत; परंतु मागील अनेक वर्षांपासून त्या कागदावरच सीमित राहिल्या आहेत. विशेषत: आवश्यक ठिकाणी हवा गुणवत्ता तपासणी केंद्र उभारणे, नागरिकांना पर्यावरणविषयी माहिती मिळावी यासाठी शहरात मोक्याच्या ठिकाणी एलईडी दर्शक फलक लावण्याची योजना आहे. त्यापैकी काही ठिकाणी असे फलक लावलेही आहेत; परंतु प्रत्येक प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही, त्यामुळे शहरातील प्रदूषणाचा विषय गंभीर होताना दिसत आहे.

Web Title: Navi Mumbai second place in polluted cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.