उरण येथील नौदल कामगाराच्या पत्नीने गळफास घेऊन संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 18:41 IST2023-09-30T18:41:25+5:302023-09-30T18:41:49+5:30
२२ वर्षीय विवाहित महिलेने पंख्याला साडीने घेतला गळफास

उरण येथील नौदल कामगाराच्या पत्नीने गळफास घेऊन संपवलं जीवन
मधुकर ठाकूर, उरण: तालुक्यातील केगाव-आवेडा येथील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका २२ वर्षीय विवाहित महिलेने पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (३०)सकाळी घडली आहे. दुदैवी विवाहितेचे नाव पल्लवी कुमार असुन तीचे पती नौदलात काम करीत आहेत.
पल्लवी कुमार (२२) या महिलेचा विवाह करंजा येथील नौदलात काम करणाऱ्याशी नुकताच झाला आहे.हे विवाहित जोडपे केगाव- आवेडा येथील सरस्वती अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील २०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये रहात होते. मात्र शनिवारी पल्लवीने पती घरात नसताना छताच्या पंख्याला साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना उघडकीस आली.
खबर मिळताच मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे.मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उरण येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.आत्महत्येचे नेमके कारण तपासाअंती समजून येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.