शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

रायगडमध्ये राष्ट्रवादीकडे ४८ ग्रामपंचायती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 3:14 AM

रायगड जिल्ह्यातील १२१ पैकी २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९६ ग्रामपंचायतींकरिता बुधवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी संबंधित तहसीलदार कार्यालयांत करण्यात आली.

विशेष प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्ह्यातील १२१ पैकी २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९६ ग्रामपंचायतींकरिता बुधवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी संबंधित तहसीलदार कार्यालयांत करण्यात आली. सर्वाधिक ४८ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केल्या आहेत, तर २८ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपला विजयी भगवा फडकावला आहे, तसेच १५ ग्रामपंचायतींवर शेकापक्षाने आपला लाल बावटा फडकावला आहे. काँग्रेसला ८ ग्रामपंचायतीत विजय संपादन करता आला आहे तर १६ ग्रामपंचायतीत स्थानिक राजकीय आघाड्यांनी विजय संपादन केला आहे. भाजपाला मात्र केवळ तीन ग्रामपंचायतीत यश मिळवता आले आहे. तीन ग्रामपंचायतीत नियोजित आरक्षणाचे उमेदवार मिळू शकले नसल्याने या तीन ग्रामपंचायतींची सरपंचपदे रिक्त राहिली आहेत.अलिबाग तालुक्यातील सात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना यांना प्रत्येकी दोन तर एका ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीला यश मिळाले आहे. मुरुड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक आघाडीलाच यश मिळाले आहे. पेणमधील ९ ग्रामपंचायतींपैकी चार शेकापने काबीज केल्या आहेत तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना प्रत्येकी एका ग्रामपंचायतीत विजय मिळाला आहे.कर्जत, माणगाव, तळा, म्हसळा आणि रोहा तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व अबाधितकर्जतमध्ये १२ पैकी सर्वाधिक ७ राष्ट्रवादी काँग्रेसला, शेकाप आणि शिवसेनेला प्रत्येकी २ तर काँग्रेसला एका ग्रामपंचायतीत यश मिळाले आहे. खालापूरमध्ये एकूण तीनपैकी तीनही ग्रामपंचायती शिवसेनेने काबीज केल्या आहेत. माणगावमध्ये १० पैकी सर्वाधिक ६ शिवसेना तर राष्ट्रवादीने ४ जागी विजय मिळवला आहे. तळा तालुक्यातील १३ पैकी सर्वाधिक १२ राष्ट्रवादीने काबीज केल्या तर सेनेला एका ग्रामपंचायतीवरच समाधान मानावे लागले. रोहा तालुक्यात २२ पैकी सर्वाधिक २१ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केल्या आहेत. म्हसळा तालुक्यात पाचपैकी तीन राष्ट्रवादी तर काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी एक ग्रामपंचायतीत यश आले आहे.पोलादपूरच्या तीन ग्रामपंचायती शिवसेनेकडे, तर दोन शेकापकडेपोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील माटवण, सवाद, बोरावळे आणि चरई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. तालुक्यात शेकापचा लाल बावटा फडकला असून बोरावळेसह माटवणमध्ये सरपंचपदी शेकापचे उमेदवार निवडून आले आहेत, तर सवादमध्ये शिवसेनेने वर्चस्व राखले आहे.चरई, देवळे ग्रामपंचायत बिनविरोध करून शिवसेनेकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. देवळे ग्रामपंचायत सरपंचपदी बबिता दळवी, तर चरई सरपंचपदी अनिता अनिल साळवी या बिनविरोध निवडून आल्या आहेत. निकाल लागताच मुंबई-गोवा महामार्गासह महाबळेश्वर मार्गावर शेकापचा लाल बावटा फडकत असल्याचे दिसून आले.पनवेलमध्ये मतदार स्थानिक आघाड्यांच्या पाठीशी राहिलेपनवेलमधील १० ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक चार ग्रामपंचायती स्थानिक आघाडीने काबीज केल्या तर तीन ग्रामपंचायतीत भाजपा, दोनमध्ये शेकाप तर एका ग्रामपंचायतीत शिवसेनेला यश मिळाले आहे. उरणमध्ये ४ ग्रामपंचायतींपैकी सेना एक, आघाडी दोन तर एक ग्रामपंचायत रिक्त राहिली आहे.महाड, पोलादपूरमध्ये शिवसेनेची बाजीमहाडमध्ये १३ पैकी सेना व आघाडीला प्रत्येकी पाच तर काँग्रेसला तीन ग्रामपंचायतीत यश आले आहे. पोलादपूरमध्ये ५ पैकी शिवसेनेला ३ तर शेकापला २ ग्रामपंचायती प्राप्त झाल्या.सुधागडमध्ये शेकापची बाजीराबगाव/पाली : सुधागड तालुक्यात बुधवारी पाली, वाघोशी, उद्धर, कुंभारशेत नागशेत, नेणवली, चिखलगाव या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये नागशेत, नेणवली, चिखलगाव या ग्रामपंचायती सरपंचासह बिनविरोध झाल्या तर उर्वरित चार ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या. यामध्ये शेकापने बाजी मारीत सातपैकी तीन ग्रामपंचायतींवर लाल बावटा फडकवला आहे. तर शिवसेनेने दोन ग्रामपंचायतीवर शिक्कामोर्तब केले असून एका ग्रामपंचायतीवर अपक्ष राज आले आहे तर एका ग्रा.पं. वर शेकाप-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली आहे.पाली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर सर्वपक्षीयांनी बहिष्कार टाकला असताना मात्र पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवारांमध्ये लढत झाली. शेतकरी कामगार पक्षाने उद्धर, नेणवली, नागशेत या ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले. शेकाप-राष्ट्रवादी आघाडी वाघोशी तर शिवसेनेने कुंभाशेत, चिखलगाव आणि अपक्ष उमेदवारांनी पाली ग्रामपंचायतीवर विजय मिळवला.पेणमध्ये सर्वपक्षीय निकालपेण : पेणमधील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात प्रत्येक राजकीय पक्षाने आपआपल्या ताब्यातील ग्रामपंचायतीचे वर्चस्व ठेवले. गागोदेवर काँग्रेसचा झेंडा, वरेडीवर शेकापचा लालबावटा, कासूवर शिवसेनेचा भगवा तर कुहीटे ग्रामपंचायतीवर राष्टÑवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्याने राजकीय पक्षाकडून आपआपले सरपंच निवडून आल्याने निकाल समाधानकारक असाच लागला. गागोदेमध्ये मतदारांनी निकीता शिवाजी पाटील यांना विजयी केले. पेणमधील सहा ग्रा.पं. करिता निवडणूक झाली तर जावळी, करंबेळी, निधवली, बेणसे येथील सरपंच बिनविरोध निवडले. उर्वरित चार ग्रा.पं. सरपंचाची थेट निवडणूक झाली.शेकापने वरेडी ग्रा.पं.मध्ये सरपंचपदाच्या उमेदवार सुरेखा पाटील या विजयी झाल्या. कुहीरे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रज्ञा वैभव जवके विजयी झाल्या, कासू ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवार आकाश भगवान नाईक हे विजयी झाले आहेत. शेकापने वरेडी, जावळी, बेणसे, कटंवेळी, या चार ग्रा.पं. सरपंचपदावर मोहोर उमटवून आघाडी घेतली. त्या खालोखाल शिवसेना, काँगे्रस, राष्ट्रवादीने प्रत्येकी एक याप्रमाणे सरपंचपदावर मोहोर उमटविली. झोनिटवाडा व निधपली ग्रा.पं.मध्ये सरपंचपद रिक्त राहिले आहे.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या