खासदार सुनिल तटकरे यांची कोरोनावर मात, पालकमंत्र्यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 04:43 PM2020-11-02T16:43:32+5:302020-11-02T16:43:55+5:30
राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. 27 ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
रायगड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी कोरोनावर मात केली आहे. आज (2 नोव्हेंबर) त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांची मुलगी तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. 27 ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तशी माहिती त्यांनी समाज माध्यमांद्वारे दिली होती. सात दिवसांच्या उपचारानंतर आज खासदार सुनील तटकरे यांनी कोरोनाला हरवले आहे. आज दुपारी त्यांची कोरोना चाचणी नेगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.