पक्षासाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता पक्षातून अचानक निघून गेला - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 03:40 PM2024-06-23T15:40:31+5:302024-06-23T15:41:50+5:30

प्रशांत पाटील यांच्या कुटुंबीयांची सपत्नीक भेट घेऊन शरद पवार यांनी केले सांत्वन

NCP state general secretary Prashant Patil passed away, Sharad Pawar consoled the Patil family | पक्षासाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता पक्षातून अचानक निघून गेला - शरद पवार 

पक्षासाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता पक्षातून अचानक निघून गेला - शरद पवार 

मधुकर ठाकूर 

उरण  : दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते होते.पक्षाला तळागाळात पोहोचविण्याचे कामही त्यांनी केले. पक्षासाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता पक्षातून अचानक निघून गेला आहे. प्रशांत पाटील यांच्यासारखा सच्चा कार्यकर्त्याच्या निधनामुळे पक्षाची कधीही भरून न निघणारी मोठी हानी झाली आहे.अशा शब्दात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उरण भेटीत आपल्या भावना व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिणीस, आक्रमक व धडाकेबाज नेतृत्व व उरणचे सुपुत्र प्रशांत पाटील यांचे २० जून २०२४ रोजी आकस्मिक निधन झाले.त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी उरण शहरातील कामठा येथील दिवंगत प्रशांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या  कुटुंबियांचे सांत्वन केले.या प्रसंगी शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करीत प्रशांत पाटील यांनी भावूक होत श्रद्धांजली वाहिली. प्रशांत पाटील यांनी पक्षासाठी दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. हे दु:ख पेलण्याची परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना बळ देवो या शब्दात शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या. 

या प्रसंगी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे माजी आमदार जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, जेएनपीए कामगार विश्वस्त दिनेश पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरचिटणीस भावना घाणेकर, शिवसेनेचे महादेव घरत,मनोहर ठाकूर  गणेश नलावडे,कामगार नेते संतोष घरत,सचिन पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज भगत यांच्यासह विविध  राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: NCP state general secretary Prashant Patil passed away, Sharad Pawar consoled the Patil family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.