पदवाटपावरून तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 03:33 AM2017-08-23T03:33:00+5:302017-08-23T03:33:04+5:30
अलिबाग : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये पदवाटपावरून मंगळवारी चांगलीच खडाजंगी झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज धुमाळ यांनी कार्यकारिणीची नावे जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक ऋषिकांत भगत यांचे समर्थक प्रकाश थळे यांना कार्यकारिणीमध्ये स्थान न दिल्याने ते संतप्त झाले होते. मात्र भगत यांचे बंधू तथा वाडगावचे सरपंच जयेंद्र भगत यांनीच थळे यांच्या नावाला आक्षेप घेतल्याने विकोपाला गेलेला वाद काही क्षणातच मावळला.
अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही नव्याने पदाधिकारी नेमायचे होेते, तर काहींना बढती मिळणार होती. मनोज धुमाळ यांनी अलिबाग तालुक्यासाठी तीन नवीन तालुकाध्यक्ष नेमले. त्यामध्ये सुनील गुरव, सचिन धुमाळ आणि दिगंबर गायकवाड यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी सरचिटणीसपदी उमेश पाटील, चिटणीसपदी संदीप ठाकूर, समीर म्हात्रे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. अलिबाग तालुका समन्वयकपदी हेमनाथ खरसंबळे यांना पुन्हा संधी देण्यात आली, तर लवेश नाईक यांची अलिबाग तालुका संघटकपदी निवड करण्यात आली. थळ विभाग अध्यक्षपदी मनीष पाटील, मापगाव विभाग अध्यक्ष विजय कडवे, कुर्डूस मुरलीधर पाटील, चौल-रेवदंडा महेश कवळे, रामराज संतोष म्हात्रे, शहापूर जनार्दन मोकल यांची विभाग अध्यक्षपदी नेमणूक केली. चेंढरे विभाग अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता ढवळे यांचे समर्थक मनोज शिर्के यांचे नाव धुमाळ यांनी जाहीर केले. या पदावर आधी ऋषिकांत भगत यांचे समर्थक प्रकाश थळे होते. त्यांच्यावर पुन्हा जबाबदारी सोपवावी, अशी भगत यांची इच्छा होती. मात्र, तालुकाध्यक्षांनी जाणूनबुजून थळे यांच्या नावावर काट मारल्याची धारणा भगत यांची झाली. थळे हे सक्रि य नाहीत, त्यांनी कोणत्याही निवडणुकीत पक्षाचे काम केले नसल्याचा आक्षेप दत्ता ढवळे यांनी घेत शिर्के हे काम करतात त्यांच्या निवडीने पक्षाला फायदा होईल अशी बाजू मांडली. त्यानंतर वाद चांगलाच विकोपाला गेला. शाब्दिक चकमकीत कोणीच माघार घ्यायला तयार नव्हते. त्यानंतर वाडगावचे सरपंच तथा जिल्हा संघटक ऋ षिकांत भगत यांचे बंधू जयेंद्र भगत यांनी थळे यांच्याच नावाला आक्षेप घेतला. थळे हे पक्ष विरोधी कारवाया करीत असल्याचे बैठकीत सांगितले.
तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाºयांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्याला काही पदाधिकाºयांचा आक्षेप होता. आता तो दूर झाला आहे. सर्वांनी संघटित होऊन पक्षाचे काम करणे गरजेचे आहे.
- मनोज धुमाळ,
अलिबाग तालुकाध्यक्ष
पक्षातील बैठकीमध्ये निवडीबाबत असे घडतेच. त्यामध्ये विशेष असे काहीच नाही. तालुकाध्यक्षांनी पदाधिकाºयांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.
- ऋषिकांत भगत, जिल्हा संघटक