वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा, कर्जतमध्ये आमदारांचा बैलगाडीतून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 04:55 AM2018-09-29T04:55:18+5:302018-09-29T04:55:46+5:30
वाढत्या महागाई विरोधात कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. पेट्रोल व डिझेल भाववाढीचा निषेध म्हणून आमदार सुरेश लाड यांनी बैलगाडीतून प्रवास केला.
कर्जत/माथेरान - वाढत्या महागाई विरोधात कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. पेट्रोल व डिझेल भाववाढीचा निषेध म्हणून आमदार सुरेश लाड यांनी बैलगाडीतून प्रवास केला.
मोर्चात भगवान भोईर, जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा उज्ज्वला हजारे, कर्जत खालापूर विधानसभा संघटक प्रतीक्षा लाड, तालुका युवक अध्यक्ष सागर शेळके आदी संख्येने उपस्थित होते.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकामधून मोर्चाची सुरुवात झाली. वीज दरवाढ मागे घ्या, नाही तर खुर्ची खाली करा आदी घोषणा देत, मोर्चा बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून तहसील कार्यालयावर पोहोचला.
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, विजेचे दर कमी करावेत, रेशनिंगवरील धान्य बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे तो त्वरित थांबवावा, सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी आदी मागण्यांसह शेतकºयांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च व अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशा पाच मागण्यांचे निवेदन तहसीलदार अविनाश
कोष्टी यांना या वेळी देण्यात
आले.
बाइक रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध
मुरुड जंजिरा : मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने इंधन दरवाढीच्या विरोधात मुरुड तहसील कार्यालयापर्यंत बाइक रॅली काढली. रॅलीत आॅटो रिक्षाही सामील झाल्या होत्या. सदरचा मोर्चा तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला.
आज पेट्रोल व डिझेलचे भाव दिवसागणिक वाढत आहेत, त्यामुळे आपोआपच बाजारपेठेतील अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने भाजपाच्या या सरकारमध्ये गरिबांना जीवन जगणे कठीण झाले आहे.
सामान्य माणसाच्या हितासाठी
व डिझेल व पेट्रोलचे भाव
नियंत्रित करा, या प्रमुख मागणीसाठी आम्ही हा मोर्चा काढल्याचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी सांगितले. या वेळी या मोर्चात शेकडो लोक सामील झाले होते. तहसील कार्यालयात मोर्चा येताच तहसीलदार उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
महागाई विरोधात मोर्चा
श्रीवर्धन : वीज, उद्योग व शेती सर्वत्र महागाईचा भडका उडाला आहे. देशातील सर्वसामान्य जनता महागाईमुळे त्रस्त झाली आहे. विद्यमान केंद्र सरकारने तत्काळ महागाई कमी करावी, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रीवर्धन तहसीलदारांना देण्यात आले.
मोर्चाचे आयोजन सोमजाई मंदिर ते तहसील कार्यालय
असे करण्यात आले होते. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. वीज नियामक मंडळाने घरगुती वापराची वीज, उद्योगासाठी वापरण्यात येणारी वीज, शेती पंपासाठी वापरण्यात येणारी वीज यांची दरवाढ भरमसाठ झाली आहे. इंधन दरवाढ गगनाला भिडली आहे सरकारने या सर्व बाबी गांभीर्याने घ्याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. मोर्चात मोहम्मद मेमन, नरेंद्र भुसाने, जितेंद्र सातनाक, गणेश पोलेकर, मंगेश पोलेकर, भावेश मांजरेकर, मोहन वाघे, ऋ तुजा भोसले व अविनाश कोळंबेकर आणि इतर पक्ष कार्यकर्ते होते.