जिते गावाजवळ गाडी अडवून केली लूट
By admin | Published: September 2, 2016 03:40 AM2016-09-02T03:40:53+5:302016-09-02T03:40:53+5:30
गणेशोत्सवाकरिता गणेशभक्त कोकणात जाण्यास सुरुवात झाली असतानाच ३१ आॅगस्टला रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर पेण नजीक जीते गावाच्या हद्दीत स्विफ्ट
वडखळ : गणेशोत्सवाकरिता गणेशभक्त कोकणात जाण्यास सुरुवात झाली असतानाच ३१ आॅगस्टला रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर पेण नजीक जीते गावाच्या हद्दीत स्विफ्ट कार अडवून सहा लाख रु पये लुटून दरोडेखोर पसार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गणेशभक्तांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
मुलुंड, मुंबई येथील आॅटो पार्ट्सचे घाऊक विक्र ेते असलेले महेंद्र शहा (४३ ) हे बुधवारी रात्री विक्र ी केलेल्या आॅटो पाटर््स मालाची रोख रक्कम घेऊन स्विफ्ट कारने मुंबईकडे जात होते. यावेळी मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील जीते गावाच्या हद्दीत आली असता दोन मोटारसायकलवरु न आलेल्या चार दरोडेखोरांनी त्यांची गाडी अडवून चालक गोविंद संक्षवा यास मारहाण केली. त्यास सोडविण्यासाठी गाडीचे मालक महेंद्र शहा हे गेले असता दरोडेखोरांनी त्यांना देखील मारहाण केली. या दरम्यान एका दरोडेखोराने शहा यांची कार ताब्यात घेऊन पलायन केले व उर्वरित दरोडेखोर जीते गावाकडे पळून गेले. ५ लाख ९७ हजार पाचशे रुपयांसह स्विफ्ट गाडीसह पलायन केले . याबाबतची माहिती शहा यांनी दादर सागरी पोलीस स्टेशनमध्ये दिली. दरोडेखोरांनी स्विफ्ट मुंबई-गोवा महामार्गाच्या कडेला पोलिसांना आढळून आली. उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.