माणगाव : विचाराची लढाई धर्माच्या नावावर भाजप व शिवसेनेने चालू केली आहे. धर्म आणि जात यांचे भावनिक आवाहन करीत या जिल्ह्यामध्ये मतभेद करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ज्या वेळी जातीयवादीशक्ती माध्यमातून होत असतो. धर्मनिरपेक्ष विचारशक्ती एकत्र येणे काळाची गरज आहे, असे उद्गार गोरेगाव येथे आयोजित प्रचाररॅलीत सुनील तटकरे यांनी काढले.गेली दहा वर्षे ज्यांना संधी दिली, याच भागातून त्यांना मताधिक्य दिले त्यात देवळी, नागाव, भिंताड, हरकोल, मांजरोणे यांचा सामावेश आहे. मात्र, त्यांनी काढलेल्या सिंहावलोकन विकासपुस्तिकेत एकही काम या भागातील केलेल्याचा उल्लेख नसल्याचा तटकरे यांनी सांगितले. गोरेगावमध्ये मी पक्षाच्या माध्यमातून धारणाचे काम, साडेतीन कोटींचे फिल्टर प्लांट, साडेतीन कोटींचे गाव तलाव सुशोभीकरण, बौद्ध समजासाठी विहार, चर्मकार समाजासाठी समाजभवन आणि सर्वात महत्त्वाचे गोरेगावचे मानबिंदू असलेले विष्णू तलावाकरिता सभागृहात वाद घालून पर्यावरणमंत्री यांच्याकडून विष्णू तलावाचे सुशोभीकरण मंजूर केल्याचे या वेळी तटकरे यांनी आवर्जून सांगितले.या वेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप कार्यकर्त्यांना घराघरांत जाऊन प्रचार करीत, दोन लाख मताधिक्यांने निवडून आणू, असे आवाहन करीत गोरेगाव व परिसराचा विकास करून घ्या, असे म्हणाले. प्रचार रॅलीकरिता माजी आमदार माणिक जगताप, राष्ट्रवादी राष्ट्रीय महिला अध्यक्षा चित्रा वाघ, काँग्रेस नेते श्रीनिवास बेंडखळे, जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसळकर राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ते विजयराव खुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
धर्मनिरपेक्ष विचारशक्ती एकत्र येण्याची गरज - सुनील तटकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:01 AM