माथेरानमधील वृक्षांच्या संगोपनाची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:14 AM2019-02-07T03:14:45+5:302019-02-07T03:15:09+5:30
हेरिटेज दर्जा प्राप्त असलेल्या माथेरान मिनीट्रेनच्या मार्गावर असंख्य जुनाट झाडे असून, अतिवृष्टीमध्ये केव्हाही उन्मळून पडू शकतात अशा अवस्थेत आहेत.
माथेरान- हेरिटेज दर्जा प्राप्त असलेल्या माथेरान मिनीट्रेनच्या मार्गावर असंख्य जुनाट झाडे असून, अतिवृष्टीमध्ये केव्हाही उन्मळून पडू शकतात अशा अवस्थेत आहेत. या जुन्या झाडांच्या संगोपनासाठी तसेच संभाव्य धोका टाळण्यासाठी गॅबियन वॉल बांधणे गरजेचे आहे. त्यासाठी रेल्वेच्या संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष केंद्रित करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. माथेरानच्या मिनीट्रेनमध्ये सफरीचा आनंद घेताना ्पर्यटकांकडूनही येथील झाडांची पडझड होत असल्यामुळे संरक्षणासाठी उपयाय योजना करण्याची मागणी होत आहे. २००५ च्या अतिवृष्टीमध्ये रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
2आजवर या मार्गासाठी खूपच खर्च केला जात आहे. त्याचबरोबर या मार्गात अडचण ठरत असलेल्या जुनाट झाडांच्या संगोपनासाठी आणि नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षा कवच म्हणून संरक्षणासाठी गॅबियन वॉल बांधणे गरजेचे आहे. पर्यटक दस्तुरी येथील अमन लॉज रेल्वेस्टेशनमधून रेल्वे रु ळांवरून पायी येत असतात, तर मिनीट्रेनसुद्धा ये-जा करीत असते, त्यामुळे पावसाळ्यात झाडे कोसळून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी रेल्वेच्या अधिकाºयांनी पुढाकार घेऊन ज्या झाडांची मुळे वर आलेली आहेत त्यांना गॅबियन वॉल बांधून संरक्षण करावे, अशीच मागणी जोर धरत आहे.