शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

बेलापूरसह वाशीमध्ये विशेष उपाययोजनांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 11:31 PM

नेरूळ पूर्वमध्येही रुग्ण वाढले : झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात सातत्यपूर्ण यश; ८ ठिकाणी जनजागृतीची आवश्यकता

नामदेव मोरे 

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ‘ब्रेक द चेन’ अभियानास यश येऊ लागले आहे. ८ पैकी ६ विभाग कार्यालय परिसरांत अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या घटली आहे. बेलापूर, वाशी व नेरूळ पूर्व या परिसरात मात्र रुग्णसंख्या वाढली असून, तेथे विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात सातत्य राखण्यात यश प्राप्त झाले आहे. २३ पैकी ८ नागरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात रुग्णसंख्या वाढली असून, तेथे व्यापक जनजागृती करावी लागणार आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणासाठी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. ब्रेक द चेन व मृत्युदर नियंत्रणात आणण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या अभियानामध्ये विभाग कार्यालय व नागरी आरोग्य केंद्रांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. या दोन्हींच्या माध्यमातून कोरोना नियंत्रणाचे काम केले जात आहे. विभाग अधिकारी व नागरी आरोग्य केंद्राचे प्रमुख या सर्वांशी आयुक्त सातत्याने संपर्क ठेवत असून, कामकाजाचा आढावा घेत आहेत.१५ आॅगस्ट ते २८ सप्टेंबरदरम्यानच्या शिल्लक रुग्णांचा आढावा घेतल्यास ८ पैकी ६ विभाग कार्यालय परिसरात रुग्णसंख्या कमी करण्यात यश आले आहे. बेलापूर व वाशी विभाग कार्यालय परिसरात शिल्लक रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढली आहे. नेरूळ पूर्वमध्येही रुग्णसंख्या वाढली आहे. या परिसरामध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील २३ पैकी १५ आरोग्य केंद्रांच्या परिसरात रुग्णसंख्या कमी करण्यात यश आले आहे. ८ ठिकाणी शिल्लक रुग्णसंख्या वाढली असून, त्या ठिकाणीही जनजागृती वाढवावी लागणार आहे.नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने प्रत्येक विभागामध्ये सातत्याने जनजागृती केली जात आहे. परंतु काही ठिकाणी नागरिकांचा निष्काळजीपणा वाढत आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे काटेकोर पालन केले जात नाही. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची माहिती देणे व कोरोना चाचणी करण्याविषयीही उदासीनता दाखविली जाते. यामुळे काही ठिकाणी रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नवी मुंबईमध्ये झोपडपट्टी परिसरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात यश येत आहे. <झोपडपट्टी भागात शिल्लक रुग्णसंख्येचे प्रमाण कमी होत असून, या कामगिरीमध्ये सातत्य राहत आहे. शहरातील इतर विभागांमध्येही कामगिरीत सातत्य राहिल्यास नवी मुंबईमधील परिस्थिती लवकर नियंत्रणात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नवी मुंबईमध्ये सुरुवातीच्या काळात तुर्भे स्टोअर्स व तुर्भे सेक्टर २१ च्या परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला होता. शहरातील सर्वाधिक रुग्ण याच परिसरात होते. यानंतर तुर्भे नागरी आरोग्य केंद्रातीलडॉ. कैलास गायकवाड, इतर कर्मचारी, विभाग कार्यालय व या परिसरातील लोकप्रतिनिधी या सर्वांनी व्यापक जनजागृती, नियमांचे काटेकोर पालन करून कोरोनाची वाढ नियंत्रणात आणली व चार महिन्यांपासून सातत्याने ‘तुर्भे पॅटर्न’ यशस्वी ठरला.विभाग कार्यालय परिसरातील शिल्लक रुग्णांची संख्याविभाग १५ आॅगस्ट २८ सप्टेंबरबेलापूर ५९० ६०५नेरूळ ७३४ ६३२वाशी ३४९ ५०८तुर्भे ४४५ ३८८कोपरखैरणे ५७४ ५२९घणसोली ४८२ ३४८ऐरोली ५४३ ४७०दिघा ८६ ४२

टॅग्स :Raigadरायगड