कुपोषणावर मात करण्यासाठी एकत्र कामाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:37 AM2019-09-20T00:37:38+5:302019-09-20T00:37:41+5:30

लोकशाहीमधील सर्वात मोठा देश आपला आहे, अनेक नव्या तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसत आहे,

Need to work together to overcome malnutrition | कुपोषणावर मात करण्यासाठी एकत्र कामाची गरज

कुपोषणावर मात करण्यासाठी एकत्र कामाची गरज

Next

कर्जत : लोकशाहीमधील सर्वात मोठा देश आपला आहे, अनेक नव्या तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसत आहे, मुंबईजवळील कर्जत तालुक्यात कुपोषित मुले सापडतात, हा कुपोषण शब्द आपल्याला कमीपणाचे लक्षण आहे, शासन खूप उपाययोजना करीत आहे, आदिवासींचे जीवनमान उंचविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून आश्रमशाळा सुरू केल्या आहेत, कुपोषणावर मात करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सुरेश लाड यांनी बाल उपचार केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी केले.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे यांच्या विशेष प्रयत्नातून, दिशा केंद्राच्या पोषण हक्क गटाच्या वतीने सततच्या केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्हा विकास योजना (डीपीसी)मधून कर्जत तालुक्यासाठी बालविकास केंद्र चालवण्यासाठी दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. बुधवार, १८ सप्टेंबर रोजी कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे बालउपचार केंद्र सुरू करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त शल्य चिकित्सक प्रमोद गवई, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, वैद्यकीय अधीक्षक मनोज बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या डॉ. जयश्री म्हात्रे, डॉ. लक्ष्मीकांत तलवारे, डॉ. रामकृष्ण पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर आदी उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यात कशेळे ग्रामीण रुग्णालय येथेसुद्धा उपचार आणि आरोग्य सेवा देण्याचे नियोजन करावे अशा सूचना आमदार सुरेश लाड यांनी केल्या. या वेळी एस. एस. तांबे, संगीता भगत, आदीसह अंगणवाडी सेविका, पालक उपस्थित होते.
>२१४ कु पोषित बालके
तालुक्यात तीव्र कुपोषित श्रेणीतील ४५ बालके, मध्यम तीव्र कुपोषित श्रेणीतील १६९ बालके अशी तालुक्यात २१४ बालके आहेत. त्यामध्ये तीव्र कुपोषित श्रेणीतील ४५ बालकांना उपचार केंद्रात उपचार दिले जाणार आहेत. तीव्र कुपोषित श्रेणीतील ११ मुले पहिल्या टप्प्यात या बाल उपचार केंद्रात दाखल करून या मुलांना आरोग्य व पोषण सेवा मोफत दिली जाणार आहे. कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज बनसोडे यांच्यामार्फत मुलांवर उपचार केले जाणार आहेत.
>उपचार घेणाºया मुलांच्या पालकांना मिळणार बुडीत मजुरी
उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणाºया बाल उपचार केंद्रात अ‍ॅडमिट केलेल्या मुलांसह त्यांच्यासोबत येणाºया एका पालकास मोफत भोजन व इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. २१ दिवस उपचार केंद्रामध्ये उपचार घेण्यात येणाºया पालकांना प्रति दिन १०० रुपये याप्रमाणे बुडीत मजुरी देण्यात येणार आहे. पालकांनी मुलांसोबत येताना स्वत:चे बँक अकाउंट व आधार कार्ड सोबत आणावे अशा सूचना वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी दिल्या आहेत. पोषण सेवावर देखरेख प्रकल्प कर्जतचे समन्वयक म्हणून अशोक जंगले काम पाहणार आहेत.

Web Title: Need to work together to overcome malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.