नीरव मोदीचा बंगला आज उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:33 AM2019-03-08T05:33:33+5:302019-03-08T05:33:43+5:30

नीरव मोदी याचा अलिबाग तालुक्यातील कोळगाव समुद्रकिनारी असलेला आलिशान बंगला शुक्रवारी सकाळी सुमारे १०० डायनामाइट्सच्या स्फोटाद्वारे उद्ध्वस्त करण्यात येणार आहे.

Neerav Modi's bungalow was destroyed today | नीरव मोदीचा बंगला आज उद्ध्वस्त

नीरव मोदीचा बंगला आज उद्ध्वस्त

googlenewsNext

अलिबाग: नीरव मोदी याचा अलिबाग तालुक्यातील कोळगाव समुद्रकिनारी असलेला आलिशान बंगला शुक्रवारी सकाळी सुमारे १०० डायनामाइट्सच्या स्फोटाद्वारे उद्ध्वस्त करण्यात येणार आहे. या कारवाईची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मोदीचा १०० कोटींचा बंगला पाडण्याच्या कारवाईचा प्रारंभ, मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीअंती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी गेल्या २५ जानेवारी रोजी केला. तेव्हा जेसीबीच्या माध्यमातून हा अत्यंत मजबूत बंगला पूर्णपणे उद्ध्वस्त करणे शक्य झाले नाही. परिणामी, तो डायनामाइट्सच्या माध्यमातून स्फोट घडवून जमीनदोस्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. डायनामाइट्स स्फोटांच्या बाबतचे संपूर्ण सुनियोजित नियोजन तज्ज्ञांच्या मदतीने करून शुक्रवारी सकाळी ९ वाजता हा बंगला जमीनदोस्त करण्यात येईल. या कारवाईकरिता ५० तांत्रिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. बंगल्याच्या विविध भागांत एकूण १०० डायनामाइट्स लावण्याचे काम गुरुवारी संध्याकाळीच पूर्ण झाले. शुक्रवारी संयुक्त स्फोटाअंती मोदीचा बंगला काही क्षणांतच जमीनदोस्त होणार आहे.
>अलिबागमध्ये पोलीस बंदोबस्त
अलिबागच्या सागरकिनारापट्टीतील नीरव मोदीसारख्या धनिकाचा बंगला डायनामाइट्स स्फोटाद्वारे उद्ध्वस्त करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. यावेळी बघ्यांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने आपत्कालीन परिस्थिती निवारण यंत्रणेबरोबरच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल.

Web Title: Neerav Modi's bungalow was destroyed today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.